जळगाव : नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 41 जणांच्या बसचा भीषण अपघता झाला. बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीय. मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना म्हटलं की, तासाभरापूर्वी मला ही माहिती मिळालेली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी तात्काळ संपर्क केला आहे. – 41 भाविक दर्शनासाठी गेले होते आणि ती बस आता नदीमध्ये कोसळलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे.अंदाजे 15 ते 16 मृतदेह सापडले असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा इथं पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते.
Bus Accident : नदीत कोसळून बसचा चक्काचूर, मृतदेहांचा खच; जखमींचा आक्रोश, मन सुन्न करणारे PHOTO
नदीत कोसळून बसचा पुरता चक्काचूर झाला होता. बसच्या वरचं छत उडालं होतं, पुढच्या भागाचा सांगाडा वेगळा झाला होता. काहीजण वेदनेनं विव्हळत होते, वाचवण्यासाठी याचना करत होते.नदीजवळच्या खडकावर मृतदेहांचा खच पडला होता. रक्तानं दगड माखले होते. जखमींचा आक्रोश होता. मन सुन्न करणारे अपघाताचे फोटो समोर आले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रवाशांना रेस्क्यू करत आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवलं जात आहे. नेपाळच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस पोखराहून काठमांडूला जात होती. अपघाता मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. त्यांची नावे समजू शकली नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





