best news portal development company in india

सायखेडा-चांदोरी रोडवरील जीवघेणा खड्डा युवकाने बुजवला; आमदार गोकुळ भाऊ गीते यांची उपस्थिती…

SHARE:

राहुल जरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक; कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी प्रशासनाला माहिती..


  प्रतिनिधी:ए वन न्युज महाराष्ट्र,नाशिक


नाशिक : सायखेडा-चांदोरी रोडवरून प्रवास करत असताना रस्त्यावर पडलेला अत्यंत मोठा आणि धोकादायक खड्डा निदर्शनास आला. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना हा खड्डा लक्षात न आल्यास गंभीर अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात येताच तातडीने तेथे थांबून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी विधानपरिषद आमदार गोकुळ भाऊ गीते हेही उपस्थित होते.
दरम्यान, या धोकादायक परिस्थितीवर केवळ चर्चा न करता राहुल जरे या तरुणाने पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डा बुजवला. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्याने केलेली ही तत्पर कृती कौतुकास्पद ठरली आहे.
आजच्या काळात सार्वजनिक ठिकाणी समस्या दिसल्यानंतर ‘मला काय त्याचे?’ अशी मानसिकता अनेकदा पाहायला मिळते. मात्र, राहुल जरे यांनी त्यापेक्षा वेगळी भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. त्यांच्या या सामाजिक भानाचे आणि जबाबदारीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
कायमस्वरूपी दुरुस्तीची गरज

खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्यात आला असला तरी या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून रस्त्यावरील परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाने या ठिकाणी तातडीने पाहणी करून रस्त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सायखेडा-चांदोरी मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची ये-जा होत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
राहुल जरे यांनी केलेली कृती ही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पुढाकार घेण्याचा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.

Aone News Maharashtra

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई