प्रतिनिधी : गोरख कसबे
गिरणारे, ए वन न्यूज महाराष्ट्र, नाशिक
नाशिक : नाशिक तालुक्यातील वाडगाव–गिरणारे परिसरात शनिवारी रात्री सुमारे १० वाजून ५ मिनिटांच्या सुमारास अचानक जमिनीमधून कंपन जाणवल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. अवघ्या १० ते १५ सेकंदांच्या या अनुभवामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अचानक घरातील पत्रे थरथरणे, खिडक्या उघडून आपटणे तसेच जमिनीखालून कंपन जाणवणे, असा अनुभव अनेकांना आला. काही नागरिकांनी घराबाहेर येऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
दरम्यान, वाडगाव परिसरातील आळंदी धरणाजवळ एका घराच्या कोसळण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा आणि रात्री जाणवलेल्या कंपनांचा परस्पर संबंध आहे की नाही, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
काही नागरिकांकडून हा प्रकार भूकंपीय हालचालींशी संबंधित असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.प्राथमिक भूकंप नोंदीनुसार, रात्री १०:००:५९ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार भूकंपाची खोली सुमारे ३.२ किलोमीटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, काही माध्यमांमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा उल्लेख करण्यात आल्याने भूकंपाची अंतिम तीव्रता अधिकृत भूकंप निरीक्षण यंत्रणेकडून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
काही जण प्लेट्सच्या हालचालींचाही उल्लेख करत आहेत. मात्र, भूकंप किंवा भूगर्भातील हालचालीचे कारण अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी भूकंपमापन केंद्र अथवा संबंधित शासकीय यंत्रणेकडून तपासणी होणे आवश्यक आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, प्रशासनाने या परिसरातील परिस्थितीची पाहणी करून घटनेचे नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सुदैवाने, प्राथमिक माहितीनुसार या कंपनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आळंदी धरण परिसरातील घर कोसळण्याच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये…
घटनेचे वैज्ञानिक कारण स्पष्ट होईपर्यंत नागरिकांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे...

गिरणारे | ए वन न्यूज महाराष्ट्र

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





