best news portal development company in india

पहिल्याच पावसात रस्त्याचे दोन तुकडे!
विघनवाडी–कारवाडी रस्त्यावरील निकृष्ट कामाचा ग्रामस्थांचा आरोप…

SHARE:


प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील विघनवाडी–कारवाडी या महत्त्वाच्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुसळधार पावसानंतर रस्त्यावर मोठे भगदाड पडून रस्ता अक्षरशः दोन भागांत विभागला गेला असून, या मार्गावरील संपर्क तुटल्याने ग्रामस्थ व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
    या घटनेनंतर रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या रस्त्याची पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामाची गुणवत्ता तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
   ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करावी तसेच वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करून रस्ता त्वरित दुरुस्त करावा. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.
     या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर

📺 अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी “ए वन न्यूज महाराष्ट्र” चॅनलला सबस्क्राईब करा.

प्रतिनिधी : भाऊसाहेब हांडोरे,
ए वन न्युज महाराष्ट्र
सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई