प्रतिनिधी:ए वन न्युज महाराष्ट्र,निफाड(नाशिक)
निफाड: तालुक्यातील खडक माळेगाव–खानगाव शिवरस्ता खुला करण्यासाठी महसूल प्रशासनाने मोठी कारवाई हाती घेतली असून, संबंधित विभागांच्या समन्वयातून सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता यशस्वीरित्या खुला करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र भाबड यांच्या प्रशासकीय आदेशानुसार करण्यात आली.

प्रत्यक्ष कार्यवाहीदरम्यान मंडळ अधिकारी रूपाली सावळे, ग्राम महसूल अधिकारी जनार्धन उशीर, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्राम महसूल सहाय्यक नाना रायते, पोलीस पाटील वैशाली राजोळे, संदीप गारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता खुला करण्यासाठी काही ठिकाणी रस्त्याच्या हद्दीत आलेले द्राक्षबागेतील अँगल व द्राक्षवेली हटविण्यात आल्या, तसेच आवश्यक तेथे जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला.

याबाबत मंडळ अधिकारी रूपाली सावळे यांनी सांगितले की, उर्वरित सुमारे एक किलोमीटर रस्ता वनविभागाची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्यातील झाडे हटवून खुला करण्यात येणार आहे.
रस्ता खुला करण्याच्या या कारवाईबद्दल दादासाहेब जंगले पाटील (राज्य समन्वयक), विजय दरेकर तसेच निफाड कृती समितीच्या सदस्यांनी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले.
या कारवाईमुळे खडक माळेगाव, खानगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी दळणवळणाचा मार्ग सुकर होणार असून, शेतीमालाची वाहतूक आणि ग्रामस्थांची ये-जा अधिक सुलभ होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





