प्रतिनिधी: एवन न्युज महाराष्ट्र,देवळा
नाशिक:जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर झाले असून, या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात तब्बल १० जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी समाधान विठ्ठल खुरसणे (वय ४०, रा. उमराणे, ता. देवळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील शेतीच्या कारणावरून जुना वाद सुरू असताना आरोपींनी शेतात येऊन शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांडे, काठ्या आणि हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या पत्नी व इतर कुटुंबीयांनाही मारहाण व धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा देवळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे –अनिल भिला देवरे,पप्पू भाऊसाहेब देवरे
अमोल भाऊसाहेब देवरे,अशोक भिला देवरे,भाऊसाहेब भिला देवरे
तात्यासाहेब पंडित देवरे,सुरेश शामराव देवरे,कौतिक शामराव देवरे,लाला पंडित देवरे,श्रावण शामराव देवरे सर्व आरोपी हे उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक येथील रहिवासी असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक १८६/२०२६ नोंदविण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल समाधान विठ्ठल खुरसणे यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे.
पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून, दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि पुरावे तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





