best news portal development company in india

लाचखोर बाबूला ACB चा दणका! येवल्यात मुख्य लिपीक ५ हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद”…

SHARE:

येवला | प्रतिनिधी “एवन न्युज महाराष्ट्र”

नाशिक: जिल्ह्यातील येवला येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत मुख्य लिपीकाला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सावकारी परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुख्य लिपीक सुधीर गोविंद वाघ (वय ४९) याला ACB च्या पथकाने सापळा रचून अटक केली.
    तक्रारदार यांच्या सावकारी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आरोपी सुधीर वाघ यांनी यापूर्वी तब्बल ६० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी आणखी ७ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १६ जून २०२६ रोजी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
    तक्रारीची पडताळणी १८ जून रोजी करण्यात आली. या पडताळणीत आरोपीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती ७ हजार रुपयांऐवजी ५ हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. तक्रारदाराला         तातडीने रक्कम घेऊन कार्यालयात येण्यास सांगण्यात आले.
यानंतर ACB च्या पथकाने येवला प्रशासकीय कार्यालय परिसरातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराने ५०० रुपयांच्या दहा नोटा म्हणजेच एकूण ५ हजार रुपये आरोपीकडे सुपूर्द करताच, दबा धरून बसलेल्या ACB च्या अधिकाऱ्यांनी आरोपी सुधीर वाघ याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
    ही कारवाई पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी तसेच छापेमार पथकातील समीर शेख यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.
    या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
    कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६८ उपलब्ध असून नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन ACB कडून करण्यात आले आहे.
— A One News Maharashtra

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......