best news portal development company in india

“गेले ते कावळे… राहिले ते मावळे!” — खासदार राजाभाऊ वाजे यांची निष्ठा कायम; नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

SHARE:

सिन्नर | प्रतिनिधी – भाऊसाहेब हांडोरे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असताना आणि विविध पक्षांतील नेते पक्षांतराच्या चर्चेत असताना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवत शिवसेनेसोबतच काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यासह देशभरातील शिवसैनिक आणि ठाकरे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिल्ली दौरा आटोपून खासदार राजाभाऊ वाजे गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर नाशिक रेल्वे स्थानकावर शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. घोषणाबाजी, फुलांचे हार आणि जल्लोषाच्या वातावरणात झालेल्या या स्वागताने परिसर दणाणून गेला.
“शिवसेनेचा ढाण्या वाघ”, “नाशिकचे निष्ठावंत खासदार”, “सिन्नरचे भूमिपुत्र मर्द मराठा” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. राजकीय संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल शिवसैनिकांनी खासदार वाजे यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
नाशिकमध्ये आल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्वप्रथम आपल्या निवासस्थानी जाऊन वडील प्रकाश वाजे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी वडिलांनी मुलाला मिठी मारून केलेले स्वागत अनेकांच्या भावनांना स्पर्श करणारे ठरले. मुलाच्या निष्ठावान भूमिकेचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. हा भावनिक क्षण उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुभवला.
यानंतर खासदार वाजे यांनी शिवसैनिक, हितचिंतक आणि समर्थकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या भावना व मनोगत जाणून घेतले. पक्षावरील निष्ठा आणि शिवसैनिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला
दरम्यान, शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नाशिकमधील भेटीगाठी पूर्ण करून ते संध्याकाळपर्यंत मुंबईकडे रवाना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रसिद्ध ओळ — “गेले ते कावळे… राहिले ते मावळे…” — पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा गौरव करणारी ही भावना राजाभाऊ वाजे यांच्या भूमिकेशी जोडून शिवसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
राजकीय बदलांच्या आणि चर्चांच्या वातावरणात खासदार राजाभाऊ वाजे यांनी घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात ठाकरे गटाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र”
संपादक :अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513
उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9637100608
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्युज महाराष्ट्र”
,सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई