प्रतिनिधी”एवन न्युज महाराष्ट्र” नाशिक
नाशिक: शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात तब्बल 32 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी दोन भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर विक्रीच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, अंश सुखराज जैन (वय 56, निवृत्त अधिकारी, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजय भागवत सोनवणे आणि नागेश सोनवणे या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी अंश जैन हे नाशिकमधील आपल्या मालकीचा फ्लॅट विक्रीस काढण्याच्या तयारीत होते. त्यावेळी ओळखीच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क झाला. फ्लॅटची किंमत 42 लाख रुपये निश्चित करण्यात आली. त्यापैकी आरोपींनी टप्प्याटप्प्याने 38 लाख रुपये बँक खात्यात जमा केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याऐवजी आरोपींनी बँक कर्ज, होम लोन प्रक्रिया आणि विविध आर्थिक कारणे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत फिर्यादींच्या बँक खात्यातील धनादेशांचा वापर करून 28 लाख रुपये विविध व्यक्ती व संस्थांच्या खात्यांमध्ये वळते केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
FIR मधील माहितीनुसार, 28 ऑगस्ट 2024 रोजी विविध खात्यांमध्ये 3 ते 5 लाख रुपयांच्या स्वरूपात एकूण 28 लाख रुपये वर्ग करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
त्यानंतरही आरोपींकडून उर्वरित 4 लाख रुपये रोख स्वरूपात देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत करण्यात आली नाही. उलट पैसे मागितल्यास धमक्या दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या FIR क्रमांक 0319/2026 नुसार आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 316(2),कलम 318(4),कलम 351(2)
कलम 352,कलम 3(5) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ यांच्याकडे सोपविण्यात आला असून, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, बँक खाते तपशील आणि संबंधित पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी सुरू आहे.
घर खरेदी-विक्री व्यवहारात विश्वासाचा गैरफायदा घेत मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप असल्याने या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस तपासातून सत्य समोर येणार असून, आरोपींविरोधातील आरोप कितपत सिद्ध होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




