best news portal development company in india

“दोन दिवसांपासून धामोरी अंधारात”; 13 हजार लोकसंख्येच्या गावात वारंवार वीज खंडित, नागरिक संतप्त…

SHARE:

प्रतिनिधी:दत्तात्रय घुले, धामोरी
     कोपरगाव : तालुक्यातील धामोरी येथील मुख्य बाजारपेठ व भैरवनाथ मंदिर परिसरासह अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त नागरिकांनी संबंधित वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे गावातील मुख्य प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या वेस कमान परिसरातील विद्युत तारांवर मोठे लिंबाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत विद्युत तारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा तात्काळ खंडित झाला. मात्र दोन दिवस उलटूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात आलेला नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
धामोरी हे बारा ते तेरा हजार लोकसंख्येचे मोठे गाव असून, मुख्य भैरवनाथ मंदिर परिसर चौफेर व्यापारी व निवासी वसाहती आहेत. या भागात किराणा दुकाने, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल, लहान-मोठी व्यावसायिक आस्थापने तसेच अनेक कुटुंबांची घरे आहेत. वीज नसल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून नागरिकांना उष्णतेसह पिण्याच्या पाण्याच्या व दैनंदिन कामकाजाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या मते, धामोरीसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावासाठी केवळ दोन लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गावात अधूनमधून तासनतास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नेहमीच घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
याशिवाय काही भागांतील स्ट्रीट लाईट व्यवस्थाही बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत.
दरम्यान, संबंधित महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन धामोरी गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,9637100608
प्रतिनिधी:दत्तात्रय घुले
एवन न्युज महाराष्ट्र
धामोरी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई