best news portal development company in india

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग रोडसाठी संपादित जमिनीबाबत शेतकऱ्यांचा आक्रोश…

SHARE:

प्रतिनिधी:एवन न्युज महाराष्ट्र,नाशिक

नाशिक:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे प्रस्तावित बाह्य रिंग रोड प्रकल्पासाठी मरखमलाबाद गावातील शेतजमिनी संपादित करण्यात येत असून, या भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.



या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत न्यायाची मागणी केली.

शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून योग्य मोबदला देण्यात यावा, तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली.

या बैठकीस खासदार सौ. शोभाताई बच्छाव, प्रांत अधिकारी श्रीमती अर्पिता ढुबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रविंद्र माने, तहसीलदार श्री. अमोल निकम यांच्यासह नगरसेवक वाळू अप्पा काकड, सागर गायकवाड, गणेश पिंगळे, अरुण पिंगळे, मोतीराम पिंगळे, तानाजी पिंगळे, धनंजय काकड, शंकर काकड, विकास पिंगळे, नवनाथ काकड, हिरामण काकड, सचिन पिंगळे, विजय पिंगळे, शांताराम पिंगळे, दत्ता गांगुर्डे, रावसाहेब शिंदे, सतीश पिंगळे, गणेश रमेश पिंगळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणामुळे मरखमलाबाद परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्युज महाराष्ट्र” संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड ,9422952513
उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे,9637100608

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई