best news portal development company in india

  खरात प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही” उदय सांगळे यांचे स्पष्टीकरण, सखोल चौकशीची मागणी…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
नाशिक : भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात सिन्नर येथील भाजप नेते उदय सांगळे यांचे नाव पुढे आल्यानंतर सांगळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खरातच्या कृत्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा ठाम दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी खरातशी संपर्कात असलेल्या काही राजकीय नेत्यांची माहिती जाहीर केली होती. त्यामध्ये उदय सांगळे यांचेही नाव असल्याचे त्यांनी नमूद केले होते. तसेच, आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून खरातच्या ट्रस्टला निधी मिळवून देण्यासाठी सांगळे यांनी पाठबळ दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर सांगळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराशी त्याचा संबंध असल्यामुळे, लोकप्रतिनिधी म्हणून काही कार्यक्रमांदरम्यान त्याच्याशी केवळ प्रासंगिक संपर्क आला असावा. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असतो. काही भेटीगाठी या केवळ योगायोगाने झाल्या असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
“खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी, ट्रस्ट किंवा संस्थांशी माझा काहीही संबंध नाही. त्याच्या भोंदूगिरीला मी कधीही पाठिंबा दिलेला नाही,” असे सांगत सांगळे यांनी काही जण जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून आपली बदनामी करत असल्याचा आरोप केला.
दरम्यान, या प्रकरणामुळे सिन्नर तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून खरात प्रकरणात नेमके कोणकोण सहभागी आहेत, याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे. सांगळे यांनी केलेल्या सखोल चौकशीच्या मागणीमुळे या प्रकरणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी“एवन न्यूज महाराष्ट्र”
संपादक:अरुण गायकवाड, उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे,
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: -9422952513/9637100608
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
“एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई