best news portal development company in india

कोळपेवाडी येथे भक्तीचा महापूर; श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न…

SHARE:

प्रतिनिधी: निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना स्थळावरील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक बाल विकास केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बार्शी कार्यक्रम व स्वामी चरित्र पारायण सप्ताह अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. परिसरात नामस्मरण, पारायण आणि आरतीच्या मंगल ध्वनीत भाविकांनी अध्यात्मिक एकात्मतेचा अनुभव घेतला.


  दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा ही परमपूज्य अण्णासाहेब मोरे (गुरुमाऊली) यांनी स्थापन केलेली प्रमुख अध्यात्मिक व सामाजिक चळवळ मानली जाते. या सेवेची मुहूर्तमेढ मोरे दादा यांनी रोवली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित हा सेवा मार्ग निस्वार्थ सेवा, नामस्मरण, पितृदोष निवारण, कृषी विकास आणि सामाजिक उन्नती यांवर भर देतो. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे या सेवेचे मुख्य केंद्र कार्यरत आहे.
कारखाना स्थळावर या केंद्राची स्थापना माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पुढाकारातून झाली असून, धार्मिक परंपरा अखंडपणे सुरू आहेत. आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्यामुळे यंदाचा सोहळा अधिक नियोजनबद्ध व भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
   पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्वामी चरित्र पारायण सप्ताहात तब्बल 150 महिला व 35 पुरुष असे एकूण 185 भाविक पारायणासाठी बसले होते. सहा दिवस अखंड नामस्मरणाची सेवा देण्यात आली. त्यामध्ये दोन व्यक्ती माळ जप, दोन व्यक्ती श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन आणि दोन व्यक्तींचे अखंड विनावादन अशी सेवा रात्रंदिवस सुरू होती. या पारायणामुळे संपूर्ण परिसर स्वामीमय झाला होता.


  या सोहळ्यात कारखाना व परिसरातील सेवेकऱ्यांसह सुरेगाव, कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, शहाजापूर, विघनवाडी, कोळगाव माळ, वेळापूर आदी गावांतील महिला भगिनी व स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. सांगता महाआरतीने करण्यात आली आणि सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
   या प्रसंगी कारखान्याचे कर्मचारी, पदाधिकारी व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळालेला हा पुण्यतिथी सोहळा कोळपेवाडी परिसरासाठी अध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “ए वन न्यूज महाराष्ट्र” संपादक:अरुण चंद्रभान गायकवाड,9422952513 उपसंपादक:ज्ञानेश्वर यशवंत सांगळे, 9637100608
प्रतिनिधी:निवृत्ती पगार
“एवन न्यूज महाराष्ट्र”
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई