best news portal development company in india

धामोरीत भीमगर्जना! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा अभूतपूर्व सोहळा; विद्युत रोषणाई आणि अश्व रथाने वेधले सर्वांचे लक्ष

SHARE:

प्रतिनिधी: दत्तात्रेय घुले धामोरी,कोपरगाव
तालुक्यातील धामोरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी सार्वजनिक जयंती अत्यंत उत्साहात, जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि भव्य मिरवणुकीने संपूर्ण धामोरी परिसर भीममय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने व धम्मवंदनेने झाली. जयंतीनिमित्त संपूर्ण आंबेडकर मैदान आणि चावडी परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.


११ एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले.
१३ एप्रिल रात्री ८ वाजता प्रसिद्ध गीतकार संदीप रमेश आहिरे यांचा ‘स्वररंग ऑर्केस्ट्रा’पार पडला. भीमगीतांच्या सुरावलींनी जनसागर मंत्रमुग्ध झाला होता. रात्री ११:५५ वाजता बुद्धवंदना आणि भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसरात चैतन्य पसरले.
१४ एप्रिल (मुख्य सोहळा) सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन झाले. तसेच कालकथित बबन दामोदर आहिरे व सौ. सत्यभामा रामचंद्र आहिरे यांच्या स्मरणार्थ महाप्रसाद (भोजनदान) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी एक कौतुकास्पद पाऊल उचलत,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले मित्र मंडळ, धामोरी यांच्या वतीने सम्यक सामाजिक विकास संस्थेच्या ग्रंथालयाच्या नवीन बांधकामासाठी २५ हजार रुपयांची देणगी सुपूर्द करण्यात आली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार कृतीत आणल्याबद्दल मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


  सायंकाळी ५ वाजता बँड पथकाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. विद्युत रोषणाईने सजवलेला अश्व रथ हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते.
मिरवणूक धामोरी वेस कमान, कालभैरवनाथ मंदिर चौक, श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, खंडेराव मंदिर, साळाई माता मंदिर, ग्रामपंचायत परिसर आणि संत सावता महाराज मंदिर परिसरातून काढण्यात आली.
सहकार्य: श्री संत सावता महाराज प्रतिष्ठानच्या वतीने भीम अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले, जे सामाजिक एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरले.
या महोत्सवात महिला व पुरुष भीम सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे, गवळी दादा आणि पोलीस पाटील सौ. संगीताताई विजयराव ताजणे यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष:अशोक सुधाकर आहिरे,उपाध्यक्ष:अमोल सिद्धार्थ आहिरे नियोजक: सुमेध अरुण आहिरे, विकेश सुरेश आहिरे, सुनील मारुती आहिरे, वैभव मोहन आहिरे, राहुल सुनील आहिरे, विनायक अरुण आहिरे यांसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


धामोरीच्या या ऐतिहासिक मिरवणुकीची सांगता रात्री उशिरा जयघोषात करण्यात आली. परिसरात या शिस्तबद्ध आणि भव्य नियोजनाची मोठी चर्चा सुरू आहे.

सत्य वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “ए वन न्यूज महाराष्ट्र” संपादक: अरुण चंद्रभान गायकवाड 9422952513,उपसंपादक: ज्ञानेश्वर यशवंत सांगळे 9637100608
प्रतिनिधी दत्तात्रेय घुले, धामोरी (कोपरगाव)
ए वन न्यूज महाराष्ट्र

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई