नाशिक | विशेष प्रतिनिधी
नाशिक:आजच्या कलियुगात जिथे प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला आहे, तिथे नाशिकच्या एका रिक्षाचालकाने आपल्या कृतीतून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. दिंडोरी नाका ते म्हसरूळ रोड मार्गावर रिक्षा चालवणारे चेतन पांडुरंग झगडे यांनी एका प्रवाशाने चुकीने ऑनलाईन पाठवलेले २०,००० रुपये पूर्ण इमानदारीने परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
दिंडोरी नाका परिसरातून मसूर रोडसाठी एका प्रवाशाने चेतन झगडे यांची रिक्षा भाड्याने घेतली होती. प्रवासाचे भाडे नियमानुसार २५ रुपये झाले होते. इच्छित स्थळी पोहोचल्यावर प्रवाशाने ऑनलाईन पद्धतीने पैसे देण्याचे ठरवले. मात्र, घाईगडबडीत प्रवाशाकडून २५ रुपयांऐजी तब्बल २०,००० रुपये चेतन यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाले.
यावेळी रिक्षा चालक चेतन भाऊ यांच्या रक्कम खात्यात जमा झाल्याचा मेसेज पाहिल्यानंतर चेतन झगडे यांच्या लक्षात आले की, प्रवाशाने चुकीने मोठी रक्कम पाठवली आहे. कोणताही मोह न धरता चेतन यांनी तातडीने त्या प्रवाशाशी संपर्क साधला. “तुमचे चुकून आलेले पैसे माझ्याकडे सुरक्षित आहेत,” असा विश्वास देत त्यांनी ती पूर्ण रक्कम प्रवाशाला परत केली. अवघ्या २५ रुपयांच्या भाड्यासाठी २० हजारांचा मोह न धरणाऱ्या चेतन यांच्या या निर्णयाने सर्वजण अवाक झाले.
कष्टाची भाकरी खाण्यातच खरा आनंद असतो, हे चेतन पांडुरंग झगडे यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल परिसरातून आणि प्रवासी वर्गाकडून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. म्हसरूळ रोडवरील नागरिकांनी आणि रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी चेतन यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्यासारख्या सुसंस्कृत रिक्षाचालकांमुळेच जनसामान्यांचा रिक्षाचालकांवरील विश्वास अधिक दृढ होतो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





