प्रतिनिधी: भाऊसाहेब हांडोरे ,सिन्नर
सिन्नर:मागील काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि भीषण गारपिटीने थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. कांदा, द्राक्ष, मका आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकरी आधीच बाजारभावाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेले आहे. “कधी माल आहे तर भाव नाही, आणि भाव आहे तेव्हा माल नाही” अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला आता निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीमुळे उन्हाळ कांदा, मका, गहू आणि चारा पिके जमिनीदोस्त झाली आहेत.”पिकवलेला लाल कांदा कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी हताश होऊन आपला माल बाजार समितीमध्येच टाकून दिला आहे. अशा परिस्थितीत उरल्यासुरल्या उन्हाळ कांद्यावर अवकाळीने घाला घातल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने मागण्या करण्यात आल्या आहेत.
बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेने युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करावेत.
पुढील शेती मशागतीसाठी आणि पिकांच्या उभारणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये (किंवा मागणीनुसार योग्य मदत) तातडीने द्यावी. वारंवार येणाऱ्या अस्मानी संकटांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, महिला शहराध्यक्ष संगीता आगळे, शहराध्यक्ष गणेश थोरात, कार्याध्यक्ष विलास खैरनार, युवा अध्यक्ष पांडुरंग आगळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. जर प्रशासनाने वेळेत मदत केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.


एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





