प्रतिनिधी :भाऊसाहेब हांडोरे ,सिन्नर
कोळपेवाडी:सहकार महर्षी आणि माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना स्थळावर चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काळे परिवारासह राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आज सकाळी कारखाना कार्यस्थळावरील साहेबांच्या स्मारकास माजी आमदार श्री. अशोकराव (दादा) काळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री. आशुतोष दादा काळे आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ‘साहेबांचे विचार आणि त्यांनी उभी केलेली सहकार चळवळ हीच आमची खरी शिदोरी आहे,’ अशी भावना व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी नाना आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे आणि मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, आणि संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांनीही साहेबांना अभिवादन केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि साहेबांवर प्रेम करणारे सभासद व नागरिक यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.
“कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प आज सर्वांनी केला.”
साहेबांच्या विचारांचा जयघोष करत, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा अभिवादन सोहळा संपन्न झाला.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी “एवन न्यूज महाराष्ट्र”

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





