प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर, दि. ८ मार्च : अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न अंतापुर येथे पोलिसांनी वेळीच हाणून पाडत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील चार जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर येथील एका आदिवासी अल्पवयीन मुलीचा आंतरजातीय विवाह करण्याचा प्रयत्न गुरुवारी (दि.५ मार्च) अंतापुर येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कमानीजवळील शेडमध्ये करण्यात येणार होता. याबाबतची माहिती सटाणा येथील रॉयल ग्रुप या आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन विवाहाला विरोध केला.
यावेळी मुलगी, तिची आई, नवरदेव तसेच त्याचे आई-वडील आणि काही मोजके नातेवाईक उपस्थित होते. या प्रकाराबाबत संशय निर्माण झाल्याने स्थानिक पोलीस पाटील सुमनबाई खैरनार यांनी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. सुरुवातीला मुलीच्या आईने दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह होत असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी दोघांचे वयाचे दाखले तपासले असता मुलीचे वय १७ वर्षे ४ महिने तर मुलाचे वय २४ वर्षे असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा प्रकार बालविवाहाचा असल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी आकाश कन्हैया लोणारी, कन्हैया विठ्ठल लोणारी, शोभा कन्हैया लोणारी आणि मीराबाई त्र्यंबक कोथे (सर्व रा. खडकपुरा, ता. सिन्नर) यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सिन्नर परिसरात आदिवासी कुटुंबातील मुलीला आणि तिच्या आईला पैशाचे आमिष दाखवून लग्न लावण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र प्राथमिक तपासात असा कोणताही आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





