सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी – एवन न्यूज महाराष्ट्र
राहाता प्रतिनिधी | रमेश नळे
शिर्डी, दि. २७ : अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या लाँग मार्चला अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची मध्यस्थी भूमिका बजावली.
—
राजूर ते अहिल्यानगर मोर्चा; विविध घटकांचा सहभाग
अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च काढण्यात आला होता. आदिवासी शेतकरी, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवेळ परिचारक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
संगमनेर मार्गे निघालेला मोर्चा काल सायंकाळी निझर्णेश्वर येथे दाखल झाला. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते.
दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात पालकमंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने आंदोलक व विविध विभागांच्या मंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित काही मुद्द्यांवर निर्णय प्रलंबित राहिल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.
निझर्णेश्वर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी अरुण उंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर उर्वरित मागण्या मान्य झाल्याचे जाहीर केले. प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
या वेळी अर्धवेळ परिचारकांच्या मानधनात वाढ,
शालेय पोषण आहार मदतनिसांच्या मानधनवाढीस हिरवा कंदील,
भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी आदिवासी भागाला मिळावे यासाठी सर्वेक्षणाचे आदेश,बांधकाम कामगारांना आरोग्य विमा योजनेतून सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयांमुळे शेतकरी-कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत आंदोलकांना दिलासा दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत, आंदोलकांनी दाखवलेल्या संयम व सहकार्याचेही कौतुक केले.
लाँग मार्च स्थगित झाल्याने प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये संवादातून प्रश्न सुटू शकतात, याचा सकारात्मक संदेश जिल्ह्यात गेला आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
राहता
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





