best news portal development company in india

कोपरगाव नगर परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र; उपनगराध्यक्षांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप, नगराध्यक्षपदावरही टांगती तलवार?

SHARE:

प्रतिनिधी:निवृत्ती पगार, एवन न्यूज महाराष्ट्र कोळपेवाडी

कोळपेवाडी:कोपरगाव नगर परिषदेतील सत्तेच्या समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेत अपील दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर तसेच अहिल्यानगर येथील जात पडताळणी कार्यालयाकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सागर निंबा आहेर यांनी 16 फेब्रुवारी रोजी अपील सादर केल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. एम. यू. सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा कोल्हे गटाने 19 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले, तर काळे गटाला 11 आणि शिवसेना बंडखोर गटाला 4 जागा मिळाल्या. त्यानंतर नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची पहिली बैठक पार पडली.
या बैठकीत महिलांसाठी स्वच्छतागृह बांधकामासाठी 50 लाखांवरून 1 कोटी रुपये, शाळांच्या दुरुस्तीसाठी 50 लाखांवरून 1 कोटी रुपये, शहरातील बागांच्या सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये आणि आपत्ती व्यवस्थापन व रोगराई निर्मूलनासाठी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. विकासकामांना वेग देण्याचे संकेत देत सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला असतानाच विरोधकांनी कायदेशीर आघाडी उघडली आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधून निवडून आलेले व पहिल्या सत्रात उपनगराध्यक्षपद भूषवणारे जितेंद्र रणशूर यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे पराभूत प्रतिस्पर्धी सागर आहेर यांनी हा लढा उचलला असून, प्रकरण न्यायालयीन टप्प्यात गेले आहे.
अॅड. एम. यू. सय्यद यांनी याआधी अंचलगाव येथील खोट्या जातप्रमाणपत्र प्रकरणात सरपंचाला अपात्र ठरवण्यात यश मिळवले होते. त्यामुळे हे प्रकरणही गंभीर मानले जात आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये रणशूर यांना 2019 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 824 मते मिळाली. सागर आहेर यांचा 260 मतांनी पराभव झाला होता. हा पराभव जिव्हारी लागल्यानेच कायदेशीर लढा दिला जात असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना जितेंद्र रणशूर यांनी, “ही न्यायालयीन बाब असून आम्ही कायदेशीर लढा देऊ. आपली बाजू ठामपणे मांडू,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, सत्ताधारी भाजपा कोल्हे गटातील आणखी चार ते पाच नगरसेवकांविरोधातही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा दावा अॅड. सय्यद यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो.
कोपरगाव नगर परिषदेतील हा सत्तासंघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. नगराध्यक्षपदासह सत्तेच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाजप कोल्हे गट या संकटाला कसे सामोरे जाणार, याकडे शहरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी:निवृत्ती पगार
एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई