best news portal development company in india

मंत्रालयात सिन्नरच्या बाधित शेतकऱ्यांचा आवाज; नुकसान भरपाईसाठी उच्चस्तरीय बैठक…

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर

सिन्नर, दि. 19 फेब्रुवारी 2026 – चिंचोली व वडगाव पिंगळा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 37 मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुंबई येथील मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीत बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान, प्रलंबित भरपाई प्रस्ताव आणि प्रशासकीय अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
चिंचोली व वडगाव पिंगळा परिसरातील शेतकऱ्यांची जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 37 प्रकल्पामुळे प्रभावित झाली आहे. यामुळे पिकांचे नुकसान, सिंचन व्यवस्थेवर परिणाम तसेच शेतीच्या रचनेत बदल झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, आमदार माणिकराव कोकाटे, सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.
शेतकरी प्रतिनिधी म्हणून भास्कर उगले, भाऊराव झाडे, कचरू गंधास, भाऊसाहेब हरळे, दौलत झाडे, मुरली नागरे, ज्ञानेश्वर सानप, दत्तू नागरे, विठ्ठल सांगळे, पांडुरंग झाडे, रामदास झाडे, सदाशिव झाडे, सुदाम मुठाळ, शांताराम कुटे, अंबादास झाडे तसेच सिन्नर तालुक्यातील भाजपचे नेते उदय सांगळे यांनी सहभाग नोंदवला.
बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.
सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मंत्रालयापर्यंत आवाज पोहोचल्याने बाधित कुटुंबांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सत्य,वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी

“एवन न्यूज महाराष्ट्र”

प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे
Aone News Maharashtra सिन्नर

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई