प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिन्नर येथे प्रहार महिला जनशक्ती पक्षामार्फत उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे परिसरात एक आगळे-वेगळे, प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी प्रहार महिला शहर अध्यक्षा संगिता आगळे, महिला कार्याध्यक्ष आशाताई गोसावी, महिला तालुका अध्यक्षा पुष्पाताई भोसले यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी एकजुटीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत डावरे, युवा अध्यक्ष पांडुरंग आगळे, शहर अध्यक्ष गणेश थोरात, संघटक भास्कर दराडे, उपाध्यक्ष प्रकाश थोरात, पवार, सांगळे साहेब यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय महाराष्ट्र” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिवजयंतीबद्दलची आस्था यामुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला.
महिलांची प्रकर्षाने जाणवलेली उपस्थिती आणि संघटित शक्ती यामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाने शिवभक्तांच्या भावना अधिक दृढ केल्या असून सामाजिक एकात्मतेचा संदेशही दिला.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





