प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर
नाशिक
दि. 17 फेब्रुवारी 2026
नांदूर मधमेश्वर येथील श्रीराम मंदिर आणि होळकर वाड्याच्या प्रश्नावर आता ऐतिहासिक व सांस्कृतिक भावनांचा सूर उमटू लागला आहे. भूषण सिंह राजे होळकर यांनी नांदूर मधमेश्वर येथे सदिच्छा भेट देत गावाच्या सांस्कृतिक वारशाचा आढावा घेतला आणि मंदिर सार्वजनिक स्वरूपात खुले ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

ही भेट विशेष मानली जात आहे कारण हे मंदिर आणि वाडा हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दानातून उभे राहिलेले असल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना या स्थळाशी घट्ट जोडलेल्या आहेत.
भेटीदरम्यान भुषण सिंह राजे होळकर यांनी होळकर वाड्याची सध्याची अव्यवस्था पाहून चिंता व्यक्त केली. मंदिर परिसरातील वाढती वाहतूक, व्यवस्थापनातील गोंधळ आणि खाजगीकरणाच्या प्रयत्नांबाबत त्यांनी नाराजी दर्शवली.

“मंदिर ही गावाची सार्वजनिक संपत्ती आहे. ते संपूर्ण गावासाठी खुले असणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मंदिराच्या खाजगीकरणाच्या हालचालींबाबत गावकऱ्यांशी चर्चा करून तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे संकेत त्यांनी दिले.
गावकऱ्यांनीही एकमुखाने भूमिका मांडत सांगितले की, मंदिराचे व्यवस्थापन गावाच्या अखत्यारीत राहावे आणि देवस्थानाचा वापर सार्वजनिक स्वरूपातच व्हावा.
“मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी आमच्या गावासाठी दिलेले हे दान आहे. ते पुन्हा गावाच्या स्वाधीन व्हावे,” असे साकडे ग्रामस्थांनी घातले.

या प्रसंगी मुकुंद राजे होळकर, अशोक थिटे पाटील, धनगर समाजाचे नेते खंडेराव पाटील, समाधान बागल, लक्ष्मण बर्गे, दीपक सुडके, भाऊसाहेब भवर, राजेंद्र बडे, भाऊसाहेब पानसरे, वाल्मीक बडे, बाळू पगारे, रामदास काळे, भगवान जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने भुषण सिंह राजे होळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या सदिच्छा भेटीनंतर होळकर वाडा आणि मंदिर सार्वजनिक स्वरूपात राखण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मंदिर खाजगीकरणाच्या दिशेने जाते की गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश येते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक भावना यांचा संगम असलेल्या या प्रश्नावर आता नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




