प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी:देशी गोवंश संवर्धन आणि पालनाच्या कार्यात सातत्यपूर्ण, शास्त्रीय व आदर्श योगदान दिल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मंजूर येथील सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित गोशाळेला जिल्हास्तरीय सर्वोत्तम गोशाळा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला.
ही गोशाळा श्री श्री 1008 धर्मनिष्ठ राजगुरू अनंत विभूषित महाराष्ट्र पिठाधीश्वर महामंडलेश्वर दत्तात्रय रत्न महान तपस्वी विष स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १९ वर्षे देशी गोवंश संवर्धनाचे कार्य अखंडपणे करत आहे.
सन २००७ मध्ये स्वामी शिवानंदगिरी महाराज यांनी थेट राजस्थान राज्यातून नागोरी जातीच्या पाच गाई मंजूर येथे आणून या गोशाळेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १० ते १२ गिर गाई आणून त्यांचे शास्त्रशुद्ध पालन व संवर्धन करण्यात आले. आज या गोशाळेत देशी गाईंची मोठ्या प्रमाणावर संवर्धन सुरू असून, त्यांची दैनंदिन सेवा-सुश्रुषा करण्यासाठी ५ ते ६ गोपालकांची नेमणूक करण्यात आली आहे.
ट्रस्टच्या स्वतःच्या जमिनीत गाईंसाठी ताजे गवत, मका, चारा यांची लागवड करून पोषक वैरण दिली जाते. याशिवाय वर्षभरासाठी गव्हाचे भुसा, मका कुट्टी व उत्कृष्ट पशुखाद्याचा साठा करून ठेवण्यात येतो. गोशाळेच्या संवर्धनाचा दररोज सुमारे १० हजार रुपये खर्च होत असून, तो ट्रस्टच्या माध्यमातून नियमितपणे केला जातो.
गोवंशाच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय वाळुंज व डॉ. डी. जी. वायकर हे दररोज विनामूल्य सेवा देत आहेत. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत देशी गोवंशाकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी शिवानंदगिरी महाराज यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे कार्य सुरू केले असून, ते आज अनेक गोशाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोग, पुणेचे अध्यक्ष शेखर मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील विविध गोशाळांची पाहणी करून, कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मंजूर येथील या गोशाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.
हा पुरस्कार सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने
सचिव प्रकाश बापूराव ढोकणे,
वैभव ढेपले, रोहित भाऊसाहेब कणसे, कैलासराव पाटील, अण्णासाहेब गवळी,
तसेच डॉ. दत्तात्रय वाळुंज व डॉ. डी. जी. वायकर यांनी अहिल्यानगर येथे स्वीकारला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या गोशाळेचे सर्वत्र कौतुक होत असून, देशी गोवंश संवर्धनासाठी ही गोशाळा एक आदर्श केंद्र म्हणून ओळखली जात आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
कोळपेवाडी
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





