best news portal development company in india

कोट्यवधींच्या निधीचा रस्त्यावर ‘डांबर नाही, दर्जा नाही, जबाबदारी नाही!’
शहा–पंचाळे रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थ संतप्त; काम बंद पाडून प्रशासनाला थेट इशारा

SHARE:

प्रतिनिधी:किसन सोनवणे,कोळपेवाडी

Aone News Maharashtra

सिन्नर तालुक्यातील शहा–पंचाळे या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात हे काम म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या शासकीय निधीची उघड लूट असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता कोणतेही नियोजनबद्ध खोदकाम नाही, आवश्यक बेस तयार केलेला नाही, डांबराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून तांत्रिक निकषांना पूर्णपणे हरताळ फासण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब येताच परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते विजयराव घोडेराव, माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कांदळकर, सामाजिक कार्यकर्ते किसनराव सोनवणे व बाबासाहेब बंदरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीअंती हे काम असेच सुरू राहणे म्हणजे शासकीय निधीचा सरळ अपव्यय असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर रस्त्याचे काम तात्काळ बंद पाडण्यात आले.
“जोपर्यंत रस्ता शासनाच्या नियमानुसार व उत्कृष्ट दर्जाचा होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही,” असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शासन एकीकडे रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते, मात्र मंजूर निधी नेमका कशाप्रकारे खर्च केला जात आहे?कामाचे मोजमाप, थरांची जाडी व दर्जा तपासणी कोण करत आहे?जबाबदार प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी का फिरकत नाहीत?असे गंभीर प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले असून, हा प्रकार केवळ शहा गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यातील रस्ते कामांच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की,
सदर रस्त्याच्या कामाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी
बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा
रस्त्यासाठी मंजूर निधीचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा
निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी
जर या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली नाही,
जर दोषींवर कारवाई झाली नाही,
आणि जर निकृष्ट काम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला,
तर ग्रामस्थ थेट तहसील कार्यालय, बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
माननीय जिल्हाधिकारी, तहसीलदार व बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी,
स्वतः प्रत्यक्ष पाहणी करावी,निधीचा गैरवापर झाला आहे का याची सखोल चौकशी कराव आणि शहा–पंचाळे रस्ता दर्जेदार, टिकाऊ व सुरक्षित करण्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अन्यथा ‘रस्ता नाही तर आंदोलन!’ हा नारा घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.


   प्रतिनिधी Aone News Maharashtra – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी

प्रतिनिधी : किसन सोनवणे कोळपेवाडी
Aone News Maharashtra

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई