सिन्नर | प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत आज एकामागोमाग एक भीषण आगीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. माळेगाव आणि मुसळगाव एमआयडीसी परिसरात विविध केमिकल व उत्पादन कंपन्यांना आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून औद्योगिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आज दुपारी सिन्नर एमआयडीसीतील माळेगाव औद्योगिक वसाहतीत ‘विमा आरोमॅटिक्स’ तसेच धनश्री पेपर रोल कंपनीला अचानक भीषण आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात कच्चा माल, यंत्रसामग्री व साहित्य जळून खाक झाले. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, याच कालावधीत मुसळगाव एमआयडीसीतील ‘आदिमा ऑर्गनिक्स’ या केमिकल कंपनीलाही भीषण आग लागल्याची घटना घडली. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनांची धग शांत होत नाही तोच माळेगाव एमआयडीसी हद्दीतील मोहरी घाटाजवळ, वन विभागाच्या परिसरालगत असलेल्या एका कंपनीला पुन्हा भीषण आग लागली. आगीने तीव्र रूप धारण केल्याने शेजारील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्ता तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट, केमिकल रिऍक्शन किंवा सुरक्षेतील हलगर्जीपणा याबाबत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या आगींच्या घटनांमुळे एमआयडीसीतील अग्निसुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन नियोजन व प्रशासनाची तयारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणी एमआयडीसी प्रशासन, अग्निशमन विभाग व पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

एवन न्यूज महाराष्ट्र
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





