सिन्नर | प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे– Aone News Maharashtra
सिन्नर:तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरात असलेल्या शुक्रा कॉप धनश्री पेपर रोल कंपनीला सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. पेपर रोलसारखा ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाला सकाळपर्यंत अथक आणि शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
ही आग नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील गॅस कंपनीच्या अगदी जवळ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. संभाव्य धोका लक्षात घेता, सिन्नर व नाशिक येथील अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. संपूर्ण रात्रभर एमआयडीसी परिसरात कुठेही आगीची ठिणगी पडू नये, तसेच आग इतर कारखान्यांमध्ये पसरू नये यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या चहूबाजूंनी रस्त्यावर फिरत होत्या.
आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूक नियंत्रित करण्यात आली होती. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किट अथवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, एमआयडीसीसारख्या औद्योगिक परिसरात आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षा उपाययोजना आणि अग्निसुरक्षा यंत्रणांची तपासणी अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी – Aone News Maharashtra
प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे सिन्नर.

“एवन न्यूज महाराष्ट्र“
सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





