प्रतिनिधी:निवृत्ती पगार,कोळपेवाडी
कोळपेवाडी / ०७ डिसेंबर २०२५: कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी तसेच आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या वाहतूक गैरसोयीचा गांभीर्याने विचार करून, आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘समग्र शिक्षा समावेशित शिक्षण’ व ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत’ आवश्यक असणाऱ्या विविध वैद्यकीय नोंदी व प्रमाणपत्रांसाठी या सुविधेचा लाभ 70 दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मिळाला आहे, ज्यामुळे पालकांवरील मोठा आर्थिक भार हलका झाला आहे.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आरोग्य तपासणी नोंदी, दिव्यांग सहाय्यक साधनांसाठी लागणारे अहवाल, तसेच शालेय शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक असणारे दिव्यांग पडताळणी प्रमाणपत्र अशा अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना कोपरगाव येथून अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील ‘सिव्हिल हॉस्पिटल’ येथे जावे लागते. या प्रवासात दिव्यांग मुलांना घेऊन जाणे पालकांसाठी अत्यंत गैरसोयीचे व खर्चिक ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने ही मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली.

या सुविधेमुळे 70 दिव्यांग विद्यार्थ्यांसह एकूण 140 व्यक्तींना सुरक्षित आणि मोफत प्रवास करता आला, ज्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होऊन पालकांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा
या मोफत वाहन सुविधेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर, पदाधिकारी, दिव्यांग विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित डॉ. जितेंद्र रणदिवेडॉ. सपना भंडारीमाजी,नगरसेवक रमेश गवळी,फकीर मामू कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,सुनील शिलेदार,शिवाजीराव खांडेकर,तुषार गलांडे,सोमनाथ आढाव,संतोष शेलार,मनोज नरोडे,अमित आगलावे,वैभव कानडे,सुनील फंड,दादा नाईकवाडे,विजय त्रिभुवन,जनार्दन कदम,शुभम काळे,मुकुंद भुतडा,राजेंद्र उशिरे,अनिरुद्ध काळे,सुवर्णा मगर मॅडम,राजेंद्र पाखर,कांतीलाल गुरसळ,सचिन मस्के,राणी रोडे,आमदार आशुतोष काळे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे आभार मानले असून, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही सुविधा अत्यंत मोलाची ठरल्याची भावना व्यक्त केली.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





