प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”सिन्नर
सिन्नर ; दि .26 नोव्हेंबर — शहा येथील खंडोबा यात्रा निमित्त परिसरातील भाविकांनी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याने भाविकांची झुंबड उडाली आहे. यावेळेस परिसरातील वाघे मंडळी यांनी खंडोबा महाराजांची चरित्रावर गुणगान गाऊन भक्तांचे मन जिंकले आहे.

या मंदिरासाठी लोक वर्गणी न गोळा करता ग्रामस्थांच्या सहभागातून आलेल्या देणगी मार्फत पैशाची वाढ करून भव्य मंदिराची उभारणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या यात्रा उत्सवासाठी सध्याचे पुजारी मच्छिंद्र नाजगड यांचें वडील स्वर्गीय मारुती नाजगड यांनी पदरमोड करून पुढाकार घेतला व यात्रा उत्सव सुरू केला. तेव्हापासून सालाबादप्रमाणे यंदाही या उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे…
शहा येथील यात्रा उत्सवासाठी गावकरी कार्यकर्ते बाळासाहेब दशरथ जाधव. रमेश एकनाथ जाधव. बाळासाहेब नाजगड. मच्छिंद्रनाथ नाजगड. गोरखनाथ नाजगड. जानकु नाजगड. सोमनाथ नाजगड . या भक्तमंडळीने यात्रा उत्सव पार पडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे …

सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





