best news portal development company in india

सिन्नर पांढुर्ली चौफुलीवर जनतेच्या मागणीसाठी सरण रचुन रस्ता रोको…निवेदने दिली…

SHARE:


प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”सिन्नर
सिन्नर : दि. 26 नोव्हेंबर —
आज बुधवार दि.२६/११/२०२५ रोजी सकाळी ११-३० ते दुपारी १ दरम्यान भगुर,पांढुर्ली चौफुलीवर शरद शिंदेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता रोको करण्यात आला.यावेळी शरद शिंदेपाटील यांनी भगुर,पांढुर्ली रस्ता चोरीला गेला की काय?निधी हडप केला की काय?म्हणून रस्ता २ वर्षापासून रखडलाय.जनतेने मागणी करुनही निधी मंजूर होत नाही. म्हणून चौकशी होऊन कारवाई व्हावी.नागरिकांनी मंत्री कोकाटे व खा.वाजे बद्दल तीव्र संताप व्यक्त केला .सरण रचत आंदोलन करण्यात आले.सरण रचल्याने.परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
    यावेळी भगुर पांढुर्ली रस्ता झालाच पाहिजे, डुबेरे रस्ता झालाच पाहिजे, घोटी हायवेवर स्पिडब्रेकर झालेच पाहिजे. या वेळी मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली.,आदरणीय शरदचंद्रजी पवार आगे बढो.।। आदरणीय शशिकांत शिंदे साहेब आगे बढो….
जिल्हाध्यक्ष दत्तु पाटील आगे बढो….राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो .।।छत्रपती शिवाजी महाराज की जय….डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय…..महात्मा फुले की जय…।अण्णाभाऊ साठे की जय.।.।अशा घोषणाबाजी देत परिसर दणाणुन सोडला.
      माननीय नायब तहसीलदार साहेब यांनी निवेदन स्विकारत वरिष्ठांना मागण्या पोहचवुन न्याय देण्याची हमी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.पोलीस निरीक्षक भामरे साहेबांच्या नेतृत्वात काकड साहेब, बिडगर साहेब, शिंदे साहेब यांनी  चोख बंदोबस्त करत सहकार्य केले.
,सिन्नर,डुबेरे ठाणगाव रस्ता व.घोटी हायवेवर हरसुले लोणारवाडी, बेलु,आगसखिंड गावाजळ स्पिडब्रेकर व्हावे यासाठी शरद शिंदेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सरण रचुन रस्ता रोको करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सिन्नर संघर्ष समिती यांच्यातर्फे निवेदन देण्यात आली.
विनंती निवेदन   
प्रती,माननीय मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र,माननीय उपमुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र,माननीय कलेक्टर साहेब
नासिक,माननीय तहसीलदार साहेब
सिन्नर,माननीय पोलीस निरीक्षक साहेब
सिन्नर पोलीस स्टेशन,सिन्नर जि.नासिक
   पांढुर्ली, शिवडा,विंचुरीदळवी, घोरवड, बेलू, आगसखिंड, बोरखिंड, धोंडबार, औंढेवाडी परिसरातील ग्रामस्थांची खड्ड्यापासून  मुक्तता व्हावी आणि सुखकर प्रवास व्हावा, अपघातापासुन सुटका व्हावी,त्यांचे प्राण वाचावे यासाठी मागणी मंजूर व्हावी. निधी मंजुरी देत रस्ता दुरुस्ती त्वरित करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल.
या वेळी पुंजाराम हारक,रतन तुपे मा.सोसायटी सदस्य,नारायण शेळके,शिवाजी गुंजाळ,नामदेव वाजे,नानासाहेब सोनकांबळे,राहुल रुपवते,कचरू कुंदे सरपंच धोंडबार,परसराम हगवणे,शरद धनराव,अशोक कुंदे,गोरख वाघ,एकनाथ कुंदे,चिंधु गुंजाळ,योगेश रानडे,रुषी कटारे,सजन वाजे,दादा दळवी,प्रकाश बर्कले,भागुजी वाजे,वाळीबा हगवणे,शंकर हगवणे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”ए वन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई