best news portal development company in india

मी मुख्यमंत्री असताना अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या,सिन्नरला विकासाचे विनर बनवायचे,सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना प्राधान्य देतील— एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य

SHARE:

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,

“एवन न्यूज महाराष्ट्र”

सिन्नर

     सिन्नर, दि. 25 नोव्हेंबर –  मी मुख्यमंत्री असताना अनेक महत्वकांक्षी योजना सुरू केल्या परंतु माझी सर्वात लाडकी योजना कोणती आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना.. ही योजनेणे सर्वसाधारण समाजातील महिलांना आधार दिला.याचं समाधान मिळत आहे.. आता याच लाडक्या बहीणी सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना प्राधान्य देतील व नगराध्यक्ष पदासाठी थेट उमेदवार नामदेव लोंढे यांना मोठ्या मताधिक्यने निवडून देतील अशी आशा व्यक्त करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथे प्रचारसभेत बोलताना व्यक्त केली..

  सिन्नरला विकासाचे विनर बनवायचे असेल तर शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेवराव लोंढे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केले.


   सिन्नर हे शहर नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हाकेला धावून जाणारा माणूस म्हणून या शहरातील लोक नामदेवराव लोंढे यांना ओळखतात. फक्त निवडणूक आली म्हणून लोकांना मदत करत नाहीत, तर प्रत्येक वेळी त्यांच्या सुख दुःखात धावून जातात. त्यामुळे त्यांना आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून सिन्नरमध्ये परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन सिन्नरकरांना केले.

  त्यासोबतच शहरात एवढी मोठी एमआयडीसी असून आणि राज्याचे क्रीडा मंत्री इथले असूनही शहराचा विकास धड झालेला नाही. शहरात जागोजागी अतिक्रमण आहे, पाणी पुरवठा एक दिवसाआड सुरू आहे. शहरात शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर नव्या जोमाने सिन्नरला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ, इथल्या लोकांचे आयुष्या आनंदी करू, दारणा आणि कडवा योजनांद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करू, शहरातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करू, पंपिंग स्टेशन उभारू पुणे-नाशिक महामार्गावरील जोडरस्ते खड्डेमुक्त करू, सांडपाणी प्रकिया प्रकल्प राबवू असे यावेळी जाहीर केले.

    यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, सिन्नर येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामदेवराव लोंढे, त्यांच्या पॅनल मधील सर्व उमेदवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि सिन्नरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,”एवन न्यूज महाराष्ट्र”
सिन्नर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई