best news portal development company in india

यवतमाळ ९४ वर्षांनंतर यवतमाळ मध्ये अनुसूचित जमातीचा नगराध्यक्ष होणार आहे….यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाची तडफदार उमेदवार युवा महिला उच्चविद्याविभूषित तेजस्वीनी राजु चांदेकर यांना यवतमाळ येथील अनेक सामाजिक संघटनेचा पाठिंबा…

SHARE:

संपादक:अरुण गायकवाड,उपसंपादक:ज्ञानेश्वर सांगळे,” एवन न्यूज महाराष्ट्र”या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.
जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क साधा: 9422952513 / 9637100608

प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:आदिवासी समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण राहणार आहे.

   त्यामुळे आदिवासी व्यक्तिमत्व सिद्ध केले जाणार आहे.
यांच अनुषंगाने दि.२ नोव्हेंबर ला विश्राम गृह येथे तपस्वी योगाचार्य दशरथजी ताडाम यांचे अध्यक्षतेखाली यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते चर्चा बैठक बिरसा पर्व समिती च्या वतीने घेण्यात आली. यावेळी शहरातील विविध संघटना प्रतीनिधी, उच्च शिक्षित, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी राजु चांदेकर माजी संरपच वाघापूर, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे जिल्हाध्यक्ष यांची कन्या दिल्ली येथे युपीएससी परीक्षेचे प्रशासनाकडून धडे घेणारी ध्येयनिष्ठ यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्ष पदाची तडफदार उमेदवार उच्चविद्याविभूषित युवा महिला उमेदवार तेजस्वीनी राजु चांदेकर हिने अनेक सामाजिक संघटनेचा शैक्षणिक स्वकर्तुत्वाच्या वकृत्वावर यवतमाळ कृती आराखडा तसेच कायदा अभ्यास सांगुन सामाजिक संघटनेचा  बिनशर्त पाठिंबा मिळवला.
    आदिवासी समाजामध्ये महिला नगराध्यक्ष उमेदवार उच्चविद्याविभूषित व वक्तृत्वावर सर्वांची मने जिंकणारी तेजस्विनी राजु चांदेकर हिचे कौतुक अनेक सामाजिक संघटनेचे प्रतिनिधीने  यावेळी केले.


    अशा उच्च शिक्षित मुलीला वाढता पाठिंबा दिसून आल्या मुळे राजकीय पक्षांनी सुद्धा नोंद घ्यावी अशी सामाजिक भावना या वेळी निर्माण झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन देवेंद्र आतराम तर आभार मधुसूदन कोवे यांनी केले
यावेळी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अँड जयसिंग चव्हाण, प्रा.अकुंश वाकडे, निजाम काझी ,एम के कोडापे,प्रा.वसंतराव कन्नाके, मधुसूदन  कोवे, गजानन पोयाम,उमेश मेश्राम, प्रफुल्ल शंभरकर, शैलेश गाडेकर,दिलीप कुडमेथे ,प्रा.अविनाश मसराम, मधुकर मडावी, प्रशांत पवार,अवधूत पवार, , दीपक करचाल,प्रा डॉ चंद्रशेखर कुडमेथे, प्रदिप  कुमरे, बजरंग ऐबंडवार, प्रमोद नाटकर, वसंतराव गेडाम, विष्णू कुडमेथे,कृष्णा पुसनाके,अरूण पोयाम,बालु वेट्टी ,दिलीप ऊईके, मधुकर ऊईके, निशांत नैताम,चेतन बहाड, नितीन ठाकरे, बुद्धम बारसे, सचिन खाडे, राजेंद्र नागभिडकर,मनीषा तिरणकर, स्वाती गेडाम, श्रद्धा डोंगरे, रंजना परचाके, आशा चांदेकर, प्रियंका गेडाम, शोभा गेडाम, वंदना गेडाम, जोस्त्ना पोयाम, सुवर्णा कुडमेथे, शोभा उरवते, शुभांगी पवार, कल्पना नागमीडकर, दुर्गादास गेडाम, विनोद मंगाम, अशोक गेडाम, दिनकर येटकर, महादेव सिडाम, दादाराव मेश्राम, रमेश डोंगरे,रवींद्र मेश्राम, प्रशांत मसराम,लक्ष्मण उरवते, योगेश सीडाम , ,किरण आडे, प्रकाश  काळे, कुंदन आडे, सचिव खाडे,अजाबराव आत्राम भरपूर समाज बांधव उपस्थित होते.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई