best news portal development company in india

शिंदे गटाचे राजेंद्र सोनवणे व संशयित सतीश पवार यांना नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक….दोघांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी….

SHARE:


प्रतिनिधी
नाशिक : बॅक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत ९ कोटी ५८ लाख रूपयांचे शासकीय अनुदान गडप केल्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी तथा शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे (वय ४५) यास नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने सहा महिन्यानंतर अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी संशयित सतीश पवार यास अटक केली. पोलिसांनी दोघांना शुक्रवारी (दि.३१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, बँक ऑफ महाराष्ट्राच्या ॲग्री हायटेक शाखेत कार्यरत तत्कालीन शाखाधिकारी सुभाष कौटे याने पदाचा गैरवापर करत ३६ खातेदारांची कर्जप्रकरणे मंजूर केली. त्याने कर्ज खाते नसतानाही ते कर्ज खाते असल्याचे भासविले आणि अनुदानाची रक्कम मंजूर करून ती कर्जदारांच्या बचत खात्यावर वर्ग करून ५ कोटी ५५ लाख ४५ हजार ५९३ रुपयांचा अपहार केला. कर्ज आणि अनुदान असे एकूण ९ कोटी ५८ लाख ४५ हजार ५९३ रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. कौटे यांच्या या अपहारात राजेंद्र सोनवणे याने मोठी मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित सतीश पवार व संशयित राजेंद्र सोनवणे यांना अटक करून न्यायालयात हजार केले. यावेळी सरकारी पक्ष व बचाव पक्षाकडून न्यायालयात जोरदार युक्ती झाला. न्यायालयाने दोघांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
          राजेंद्र सोनवणे हे निफाड तालुक्यातील भुसे येथील मूळ रहिवासी असलेला राजेंद्र सोनवणे कालांतराने गंगापूर रोड येथे एका ब्राह्मण कुटुंबियांकडे कामासाठी आला. त्यानंतर त्याने कमी काळात इतकी मोठी ‘झेप’ घेतली की, गंगापूर रोडसारख्या भागात त्याचे काही फ्लॅट्स, रो-हाऊस झालेत. ट्रॅक्टरचे शोरूमसह त्याने मोठी ‘माया’ जमवली. पुढे नात्यातील काही लोकांच्या नावे कर्ज घेऊन तो थेट ‘उद्योजक’ बनला. कामगार ते उद्योजक, व्हाया शासकीय ठेकेदार असा सोनवणे याचा प्रवास अनेकांना बुचकळ्यात टाकणारा ठरला. सध्या तो एका ट्रॅक्टर कंपनीचा जिल्हा वितरक आहे. शिवसेना शिंदे गटाचा सहसंपर्क प्रमुख म्हणून त्याच्याकडे जबाबदारी आहे.
    अटक केलेले ९ आरोपी तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (वय ४०, रा. संगमनेर), एजंट उज्ज्वल नांद्रे (वय ५१, रा. नामपूर, ता. बागलाण), एजंट दिनेश नामदास, जीवन लक्ष्मण वाघ, सचिन गुलाब फुगट, कल्पेश सोनवणे, संकेत सिनगर, सतीश पवार, राजेंद्र सोनवणे यास नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने यांना अटक केली आहे.
       सदर लकी भास्कर चित्रपटाप्रमाणे बँक महाराष्ट्राचा मॅनेजर कौटे याने आफरातफर केली. गंगापूररोडवरील थत्तेनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अँग्री हायटेक शाखेचे हे तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (रा. पंचवटी) याने १० जानेवारी २०२३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत त्याच्या पदाचा गैरवापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कौटे याने ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज मागणीची रक्कम कमी असताना ती जास्त असल्याचे दाखविले. कर्ज खाते नसतानासुद्धा कर्ज खाते असल्याचे भासवून त्या खात्यात कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम मंजूर करत तीन कर्जदारांच्या बचत खात्यात वर्ग करत कर्ज आणि अनुदान असे एकूण ९ कोटी ५८ लाख ४५ हजार ५१३ रूपयांचा अपहार करत बँक व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी शाखाधिकारी बी. बी. बेहरा यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बेहरा यांनी जोखीम आधारित केलेल्या लेखापरीक्षणात हा घोटाळा उघडकीस आला. बेहरा यांच्या फिर्यादीवरून कौटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     अर्जानुसार पत्यावर कोणताही उद्योग नाही, याबाबत ग्रामविकास अधिकारी यांचे पोलिसांना अहवाल प्राप्त झाले आहेत. राजेंद्र सोनवणे हा एजंट आहे. त्याने बँक मॅनेजर व जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी यांच्याशी संगनमत करत याने पत्नी, मेहुणी, मुलगा, बहीण, पुतण्या आणि एकाच्या वे घेतले अनुदान व कर्ज असे एकूण २ कोटी ४० लाख रूपयांचा अपहार केला आहे.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई