पत्रकार:भाऊसाहेब हांडोरे,एवन न्यूज महाराष्ट्र,सिन्नर


सिन्नर: फ्लावर स्कूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वर्ग खोल्याची कागदपत्राची पडताळणी करून नोंद करण्याची ग्रामपंचायत लेखी आश्वासन दिल्याने कोणता चालक यांनी विजय घोडेराव यांनी सिन्नर येथील गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शहा ग्रामपंचायत तिच्या ग्रामसेविका शेख मॅडम यांनी आंदोलन करण्याची प्रत्यक्ष भेट घेऊन विजय घोडेराव यांच्या मागण्या समजून घेतल्या व यावेळी नोंदी बाबत अपूर्ण असलेल्या कागदपत्राची पूर्तता झाल्याने येणाऱ्या मासिक मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा करून सदर स्कूलच्या सर्व वर्ग खोल्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली जाईल.
तसेच श्री विजय घोडेराव यांनी ग्रामसेविकेच्या बदली संदर्भात यावेळी कुठलीही मागणी केली नाही,त्यावर कुठेही चर्चा झाली नाही. कागदपत्राची पूर्तता करण्यासंदर्भात श्री विजय घोडेराव यांना यापूर्वी सांगितले होते,परंतु त्यांच्याकडून आवश्यक असणारे कागदपत्र ग्रामपंचायतीकडे न आल्याने सदर नोंदीसाठी अडचण निर्माण होत आहे,ती आता दूर झाली असून नोंदीबाबत कुठलीही तक्रार नाही… व तसेच माझ्यावर कुठलाही राजकीय दबाव नसून नियमात बसणाऱ्या कामात माझ्याकडून कुठलीहलगर्जी होत नाही त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये. असे स्पष्ट मत ग्रामसेविका शेख मॅडम यांनी वार्ताहरांना शी बोलताना सांगितले.
लिटल फ्लॉवरच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरा वर्ग खोल्याचा ग्रामपंचायतकडे नोंदणी अर्ज सादर केला असता ग्रामपंचायतीने उडवाउडवीची दिले आहे असे संस्थाचालक घोडेराव यांचा आरोप होता. परंतु आवश्यक कागदपत्र न देता नोंदणी करणे करण्यासाठी असा आग्रहण योग्य नाही कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर ग्रामपंचायत नोंदणी करण्यास केव्हाही तयार होती आणि आजही आहे .तरी आता आवश्यक कागदपत्र मिळाल्याने वर्ग खोल्या नोंदणीचा अडथळा दूर झाला असून मासिक मीटिंगमध्ये याबाबत चर्चा करून नोंदणीचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच घोडेराव यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर केलेले आरोप निराधार असून दिशाभूल करणारी आहे. असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे..

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




