प्रतिनिधी:भाऊसाहेब हांडोरे,एवन न्यूज महाराष्ट्र, सिन्नर
_________________________________________________
सिन्नर:15/10/2025 सिन्नर तालुक्यातील शहा येथील ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते व लिटल फ्लावर स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजय घोडेराव यांनी सर्वसामन्य समाजासाठी गोरगरिब मुलांना शिक्षणाचा मार्ग मोकळा होण्यासाठी सेंट झेवियर या संस्थे अंतर्गत लिटल फ्लावर स्कूल या नावाने इंग्लिश मीडियम ची स्थापना करून शाळा सुरू केली आहे .गोरगरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून शाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतानाही काही राजकीय लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सदर शाळेची नोंद करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्या वर कार्यवाही करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता .


ह्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी त्यांना यश आले असून सदर शाळेची ग्रामपंचायत नोंद करण्याबाबतची लेखी आश्वासन देण्यात आले आहे.तसेच नऊ वर्षापासून एका जागेवर कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवक सेविका यांचीही बदली करण्याची लेखी हमी देण्यात आली असल्यानेआंदोलन स्थगित करण्यात आले आहे गट शिक्षण विकास अधिकारी यांच्या पुढाकाराने सदर ग्रामसेविका यांना समज देण्यात आले असून पुढील कार्यवाही करण्याची. हमी देण्यात आली आहे. लिटिल फ्लावर स्कूलचे संस्थापक विजय घोडेराव यांनी 15 ऑगस्ट रोजी यासंदर्भात सिन्नर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन केले होते, या अनुषंगाने गट विकास अधिकारी व शहा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका यांच्या मध्यस्थीने सर्व मागण्या पूर्ण करण्याची लेखी आश्वासन देण्यात आले असून आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
——————–

यावर घोडेराव यांनी समाधान व्यक्त केले असून संविधानाचा हा विजय असल्याची बोलून दाखवले आहे… या आंदोलनाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला असल्याने आंदोलनाची धारतीवर झाल्याची मागणी पूर्ण झाल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आंदोलनात आंदोलन कर्ते विजय रामनाथ घोडेराव,नवनाथ वाघ,प्रकाश शिंदे,किसन सोनवणे,मौलाना अफझल,सामाजिक कार्यकर्ते– उत्तम मोकळ,शामराव म्हस्के,उत्तम सेंदर आणि सर्व शहा- कारवाडी ग्रामस्थ यावेळीमोठया संख्येने उपस्थित होते..

Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......




