नाशिक रोड येथील अहिल्यादेवी स्मारकाला 30 लाख निधी मिळूनही स्मारकाच्या बांधकामातील दर्जा ढासळला = समाधान बागल…
प्रतिनिधी नाशिक:- नाशिक रोड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी भाजपचे सध्याचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर तत्कालीन विधान परिषद आमदार असताना 30 लाख निधी मंजूर झालेला होता. एवढा भरपूर निधी होता परंतु हा निधी दीर्घकाळापर्यंत पूर्णपणे खर्च होत नव्हता व काम पुर्ण होत नव्हते या संदर्भात हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधानजी बागल आणि प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा टीमच्या वतीने या ठिकाणी पाहणी दौरे आखण्यात आले व परिसराची वाताहत व वस्तुस्थिती ही विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारे महापालिका व समाजासमोर मांडण्यात आले. आणि 31 मे 2025 च्या अगोदर स्मारकाचे काम पूर्ण न झाल्यास त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष दोघांच्या वतीने देण्यात आला.त्यांच्या या आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्या मुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम हाती घेतले होते त्यांना हे काम 31 मे अगोदर पूर्ण करणे भाग पडले.परंतु ते काम पूर्णत्वास न जाता ते काम काहीसे अधुरे स्वरूपात होते. आणि ते काम थोड्या दिवसात पूर्ण करू अशा स्वरूपात कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र आज मीतिला कॉन्ट्रॅक्टर यांनी काम पूर्ण झालेले आहे असे दर्शवले आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेले काम हे अगदी तुटपुंज्या स्वरूपाचे आहे, कारण स्मारके हे पहिल्यापासून अस्तित्वात होते संरक्षण भिंती पहिल्यापासून अस्तित्वात होत्या गेट पहिल्यापासून अस्तित्वात होते त्या ठिकाणी झाडे पूर्वीपासूनच लावलेली आहेत परंतु त्या ठिकाणी केलेला खर्च हा अंदाजे चार ते पाच लाखापेक्षा जास्त नाही असा एक दर्शनी अंदाज दिसतो, आलेला निधी हा भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून 30 लाख रुपये एवढा भव्य निधी नाशिक रोड येथील स्मारकासाठी आलेला होता, मग ज्या स्ट्रक्चरच्या आधारे तीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला त्या स्ट्रक्चर प्रमाणे हे काम झाले किंवा नाही त्याचप्रमाणे आलेला तीस लाख रुपये निधी हा योग्य प्रमाणात खर्च झाला की नाही, त्यात भ्रष्टाचार झाला.
त्याचप्रमाणे मातोश्रींच्या या स्मारकाजवळ त्या ठिकाणी बसण्याची आसपास कुठलीही व्यवस्था नाही त्या ठिकाणी झाडांच्या अवतीभवती कुठल्याही प्रकारचे सुशोभीकरण झालेलं नाही. गेटचं कुठलंही सुशोभीकरण झालेलं नाही आणि स्मारकाच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने व्हायला हवे ते त्या पद्धतीने कुठलेही सुशोभीकरण व सुव्यवस्था झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती व प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त कामगिरीतून या पूर्ण प्रकाराची पोलखोल करण्यात येईल,
त्याचप्रमाणे या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे कामाचे संपूर्ण दस्तऐवज बघून पुढील लढा चालू राहील मातोश्रींच्या स्मारकात व कार्यात भ्रष्टाचार सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका समाधान बागल यांनी घेतलेली आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






