प्रतिनिधी नाशिक:-नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा आधी अज्ञातांनी पाडला व नंतर सदर वाड्याला पर्यटन विभागाने निधी दिल्याने संपूर्ण वाडा पाडण्यात येत होता,मात्र नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा हा अहिल्यादेवी होळकर यांचा खाजगी वाडा असुन त्यावर स्वातंत्र्य पुर्व काळापासून होळकर राजघराण्याचा ताबा आहे.ह्या होळकर वाड्यातील मंदीरात कायमस्वरूपी पुजा चालावी यासाठी होळकर राजघराण्याकडून काही पुजारी पगारावर नेमले गेले होते.
परंतु इंदोरहुन चालनारा होळकरांचा कारभार व नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा यातील कमी संवाद व काही नातेसंबंधांचा फायदा घेऊन पगारावर नेमलेल्या पुजारी कुटुंबाने 30 वर्ष आधी नांदूर मध्यमेश्वर गाव सोडून रहीवासा साठी बाहेरगावी गेलेले असतानाही ह्या होळकर वाड्यावन कब्जा सांगुन अहिल्यादेवी होळकर यांचा हा खाजगीचा वाडा स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गैरप्रकार घडला आहे, हा वाडा गैरमार्गाने नावावर गेल्याचे कळताच गावातील ग्रामस्थ व अहिल्यादेवी होळकर प्रेमी इतिहास प्रेमी यांनी ह्या प्रकाराला कडाडून टोकाचा विरोध दर्शवला . विविध राजकीय पक्षातील मान्यवरांनी हजेरी लावत झालेल्या प्रकाराचा निषेध महाराष्ट्र भर नोंदवला अनेक आमदार व खाजदार यांनी तशा स्वरूपाचे पत्र काढून सरकारला झालेला प्रकारावर लक्ष घालण्यासाठी विनंती केली, परंतु तरीही अद्याप हा तिढा सुटलेला नाही दरम्यान नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा हा ज्यांनी स्वताच्या नावावर करुन घेतला आहे त्या 3 भावंडांपैकी 1 व्यक्तीने आपला वाटा साधना परमार्थ ट्रस्ट नावाच्या एका संस्थेला दिलेला आहे, पण विशेष म्हणजे दान देणारी व्यक्ती ही ह्या ट्रस्ट ची सदस्य आहे व इतर सदस्यही एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहे ,आणि यामुळेच हा होळकर वाडा हडपण्यासाठीचा डाव आहे असा संशय ग्रामस्थ व होळकर प्रेमी यांनी व्यक्त केला आहे ,यात विशेष म्हणजे होळकर वाड्याच्या फक्त तिसऱ्या भागाला नाव लागलेले असताना संपूर्ण वाड्यासाठी साधना परमार्थ ट्रस्ट ने गावात बैठका घेउन दोन गटांना समोर बसवण्याचा प्रयत्न केला पण यातून गावातील वातावरण दुशित होत असुन गावच्या मंदिरावर पहीला अधिकार हा गावाचा व ग्रामस्थांचा आहे असे ग्रामस्थांचे म्हणने आहे.दरम्यान झालेला प्रकार लक्षात आल्यानंतर वाड्याचे मुळ मालक असलेली होळकर राजघराण्याची संस्था खाजगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरीटीज ट्रस्ट यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली असून ह्या खटल्याची पहीली तारीख 31/7 रोजी पार पडली.काही तारखींनंतर येणाऱ्या निर्णयावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






