best news portal development company in india

           नाशिक रोड,दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या जवळघाणीचे साम्राज्य.

SHARE:

प्रतिनिधी नाशिक:- भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष साजरे करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार मातोश्रींच्या कार्याचा गौरव साजरा करत आहेत आणि नाशिक मधील नाशिक रोड दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीची साम्राज्य दिसून येत आहे. स्मारकाच्या जवळ भरपूर मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचलेली आहे. काही समाज बांधव या परिसरात गेले असता ही परिस्थिती दिसून आली.

 मा.आमदार श्री.गोपिचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुतळ्याचे सुशोभीकरणा साठी वीस ते पंचवीस लाख निधी मिळाला आहे. परंतु अक्षरशःकुठल्याही प्रकारे काम दिसत नाहीत.काम दोन वर्षांपासून सुरू असून ठेकेदार हर्षद बुचडे व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून कामकाज रेंगाळलेले आहे व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.दिनांक 31 में रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे . हे काम कसे मार्गी लागणार आणि स्मारकाच्या निधीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असे जिल्ह्यातील समाज बांधवांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे येत्या 31 मे च्या अगोदर जर काम पूर्ण झाले नाही तर येणाऱ्या 31 मे रोजीच या ठिकाणी भव्य असे आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल.

महानगरपालिका स्वच्छता विभागाचे सुद्धा या स्थळाकडे दुर्लक्ष झाले असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

स्वच्छता विभागाने परिसराचे पावित्र्य राखले पाहजे. प्रशासन आणि ठेकेदार जर पवित्र राखत नसेल तर मोठ्या प्रमाणात समाज बांधवनि आंदोलन उभे करण्यातअसे हिंदूधर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे अध्यक्ष समाधान बागल यांनी सांगितले आहेत.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई