best news portal development company in india

युवराज यशवंतराव होळकर यांची खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ने

SHARE:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर विराजमान….

 

चांदवड:- चांदवड राजघराण्यांच्या खाजगी संपत्तीचे संचालन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी महाराणी उषादेवी होळकर- मल्होत्रा या होत्या वयोमानानुसार निवृत्ती घेत त्यांनी घराण्याचा उत्तराधिकारी म्हणून भावाचे पुत्र युवराज यशवंतराव होळकर यांची खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

 संपूर्ण चांदवड नगरी तसेच होळकर प्रेमी व हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक महाराष्ट्र राज्यअध्यक्ष समाधान बागल यांच्या कडून स्वागत करण्यात येत आहे. गेले अनेक दिवसापासून या ट्रस्टची कामकाज उषादेवी होळकर मल्होत्रा बघत होत्या. परंतु होळकर घराण्याचे वंशज या अध्यक्षपदी असावी असे संपूर्ण होळकर प्रेमींचे भावना होती. गेली काही दिवसापूर्वीच युवराज चांदवड होळकर नगरीमध्ये येऊन होळकर वाडा रंग महाल तसेच संपूर्ण चांदवड नगरीत भव्य असे स्वागत करण्यात आले होते.

शालिनीदेवी यांनी गेल्या पन्नास वर्षापासून महेश्वरी साडी पुनःजीवन करण्याचे कार्य करीत आहेत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वर येथे महेश्वरी साडी उद्योगाची सुरवात केली होती माळव्यातील महिलांना रोजगार निर्माण व्हावा तसेच या उद्योग व्यवसायातून बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी महेश्वरी साडीची निर्मिती केली होती.हातमागावर रेशीम पासून महेश्वरी साडी तयार करण्यात येते.

युवराज यशवंतराव हे आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार महेश्वरी साडी व हातमाग व्यवसाय पाहतात तसेच देशभर निर्माण केलेल्या होळकर राजघराण्यांच्या वास्तु संवर्धन जतन करण्यासाठी ते प्रयत्नशील असुन खाजगी ट्रस्ट होळकर राजघराण्यांच्या शाही संपत्ती व्यतीरीक्त खाजगी मिळकतीतून धार्मिक कार्यासाठी निर्माण केलेली विश्वस्त संस्था आहे.

महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांनी स्थापन केलेल्या या खाजगी ट्रस्टच्या अध्यक्षपदी आत्तापर्यंत त्यांच्या कन्या महाराणी उषादेवी होळकर या होत्या वयोमानानुसार त्यांचेनंतर खाजगी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून युवराज यशवंतराव शिवाजीराव होळकर (तृतीय) यांची निवड झाली असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा वारसा ते चालवतील यासाठी त्यांना कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड बळ देवो हीच सदिच्छातसेच 

 हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य वतीने अभिनंदन करण्यात येत आहेत.

Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई