best news portal development company in india

उघड्यावर ससार असल्या मेंढपाळ माहीलेचा महिलादिन कधी साजरा होणार ?

SHARE:

aonenewsmaharashtra@gmail.com

प्रतिनिधी नाशिक:

नाशिकः चांदवड:- दि.8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणन सर्वंत्र केला जातो., सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करतात. मात्र, मेंढरांच्या मागे पोटाची खळगी भरत दिवसरात्र काबाडकष्ट करणाऱ्या मैढपाळ महिलांकडे कोणी लक्षसुदा दिले नाही. अनेक महिलांच्या सत्काराचे फोटो सोशल मीडियावर वायरल होतील.. मात्र मैंढपाळ महिला अजून सुद्धा कामात व्यस्त आहेत ” मैंढपाळ महिलांना त्यांच्यासाठी कोणता दिवस स्पेशल असतो, हेही माहिती देखील नसतं. येणारा प्रत्येक दिवस हा जगण्यासाठी त्यांना आव्हान घेऊन येत असतो मेंढपाळ व्यावसायिक हा आगळावेगळा अस्तित्व तयार करणारा आहे, मेंढी अन् मेंढपाळ यांचं नात जीवाभावाचं नात बनत जातं. कळपात एखादी मेंढी जरी आजारी पडलीतरी त्या मेंढपाळाला कळतं. रानावनात जाताना एका मेंढरामागं सगळ्या मेंढ्या जातात. त्यावेळी त्यांची शिस्तबद्धता समजन कठीण येते. खेडोपाडी अशी व्यावसायिक चारा धुंडाळत फिरताना दिसतात. शेतात चारा असेल तर शेतकरी देखील त्यांना आवर्जून आमंत्रित करतो त्यामुळे खताची उपलब्धता होऊन शेती उत्पादनाला फायदा होतो. उन, वारा, पावसाची तमा न बाळगता त्याची भटकंती ही सुरूच असते., या भटकंतीला खरी जोड मेंढ पाळ व्यावसायिकाच्या पत्नीची चरातील महिलांची ठरते कर्तत्ववान माणसाच्या मागे तिचा मोलाचा वाटा असतो असे म्हटले जाते. मेंढ पाळ व्यवसाय तर या महिलांच्या कर्तत्वाचा पाठीवर पूजलेला असतो.
 शासनाने आरोग्याच्या सुविधादेणे आवश्यकता….
श्री समाधान बागल. 
1)मेंढपाळ बांधवाना विमा संरक्षण,अनुदान मिळावे.
 2) मेंढपाळ महिलांना महाराष्ट शासनाच्या व केंद्राच्या कोणत्याही आरोग्याच्या सुविधा मिळत नाही. तरी शासनाने आरोग्याच्या सुविधा मेंढ्याना मोफत तपासणी, विमासंरक्षण मेंढपाळांना दिले पाहिजे ही आमची मागणी आहे.  
3)मेंढपाळ व्यावसायिक यांना मेंढ्या ना पाणी पिण्यासाठी शासनातर्फे सुविधा उपलब्ध करून देणे
 4)मेंढपाळ बांधवांना कुठल्याही प्रकारे अपघात झाल्यानंतर विमा मिळत नाही किंवा कुठल्याही सरकारी निधी मदत मिळत नाही. सरकारने याकडे लक्ष देऊन मेंढपाळ बांधवांना मदत द्यावी आणि मेंढपाळ बांधवांचा सरकार तर्फे विमा उतरवावा.
5) मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी ग्रेझिंग कोरिडॉर तयार करावे. 
6)मेंढपाळांवरती होणाऱ्या हाल्यावरती सरकारने कठोर कारवाई करावी.
शासकीय व्यवस्था जागी कधी होणार…?
मेंढपाळांना संरक्षण कधी मिळणार…
 मेंढपाळाच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या ठरलेल्या असतात. जिथे जाईल तिथलं पाणी त्यांना प्यायला ‘भागपडते पडते,
  त्यामुळे आरोग्याच्या समस्या लवकर उद्मवतात. या समस्या सोबत घेऊनच जीवनाचा रहाटगाडगा चालवावा लागतो. घोडयावर तंब, काठया कोंबडया, नवाजात मेढ्या, संसारोपयोगी बस्तू, देवधर याबरोबर चिमुकली मुले घेऊन दररोज नवीन गावचा प्रवास अनेक समस्यांचे माहेरघर असल्यासारखं वाटतो. दररोज नवीन गावात जाऊन ठिकाण शोधायच. उभ्या पिकात जनावर गेल्यावर वेळप्रसंगी बोलणी खायची. मुकं जनावर हाय, त्याला काय कळतंय का अस म्हणत वेळ मारून न्यायचा जनावर बसायला जागा मिळाली की तिथच आपल बिऱ्हाड थाटायच. तीन दगडाची चूल करायची जवळच असणाऱ्या काडयाकुडया गोळा करायच्या., त्याचाच इंधन म्हणन वापर करायचा. गाव जवळ असल, की तेल, मीठ, मिरची मिळेल त्याच्यावर आपली उपजीविका करायची. पण या महिला मात्र मेंढपाळ धन्याला साथ देण्यासाठी सगळं ओझ् घेऊनच चालत असतात. त्यामुळे त्यांच्या चटणी.,. मिरचीच्या, भाकरीत देखील अनोखी चव दडलेली असते. चिमुकल्यांना उंकरण्याची त्यांची जिदही अनोखी असते.
 या मेंढपाळ महिलेचा बाराही महिने सुरू असणारा हा प्रवास अनोखा दिसतो. सोबतचा प्रवास करत असताना पतीला साथ देण्यासाठी वेळप्रसंगी कोणत्याही समस्यांना शारीरिक, मानसिक धैर्य ने सामोरे जाण्याची ताकद मेंढ पाळ महिलांकडे असते भाकरीचा चंद्र शोधताना तिच कर्तूव मोलाचे असल्याच दिसून येतं.
यांना महिला दिनाचे महत्त्व कधी समजणार..

महिला दिनी मेंढपाळ भगिनी चा साडी देऊन सन्मान..
श्री.समाधान बागल..
गोरक्षक,मेंढपाळ आर्मी नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई