best news portal development company in india

महाराष्ट्रसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोटींचे अनुदान…..

SHARE:

  शेतकऱ्यांच्या ऑक्टोबर 2024 मधील अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान मंजूर

प्रतिनिधी:भाऊसाहेब हंडोरे,सिन्नर

नाशिकः दि. 13 ऑक्टोबर 2024 ते दि. 19 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे चांदवड तालुक्यातील शेतीपिकांचे जे नुकसान झालेले होते, त्यासाठी शासनाच्या महसूल व वनविभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. चांदवड तालुक्यातील 108 गावांमधील 41764 बाधित शेतकऱ्यांसाठी रु.71.37 कोटी रक्कम मंजूर झालेली आहे.

     सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित केले जाणार आहे. त्यासाठी अशा शेतकऱ्यांची माहिती तहसील कार्यालयामार्फत सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे या कालावधीत नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे त्यावेळी करण्यात आलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावचे पंचनामे करणारे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा ग्राम पंचायत अधिकारी यांचेशी संपर्क करून स्वतःचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, सामाईक खाते असल्यास संमतीपत्र इ. कागदपत्रे जमा करावीत. तसेच ज्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाल्यानंतर यापुढे विशिष्ट क्रमांक (VK) प्राप्त होतील त्यांनी तात्काळ जवळच्या CSC केंद्रात जाऊन eKYC करून घेतल्यानंतरच त्यांना सदर अनुदान प्राप्त होणार आहे. तरी याद्वारे सर्व संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ कागदपत्रे जमा करणे व eKYC करणेबाबत तसेच सदर अनुदान व इतर शासन योजनांचा लाभ घेणेकरिता agristack योजनेंतर्गत farmer id तयार करून घेण्याचे तहसीलदार चांदवड यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई