प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
सिन्नर : दि, 5 मार्च 2025 — कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे जोपर्यंत अपिल सुरू आहे तोपर्यंत आमदार माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, आजच्या सुणवनी दरम्यान सत्र न्यायालयाने सदर निर्णय देताना सांगितले की माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीला सध्या कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचत नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे, त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली आहे…

माणिकराव कोकाटे प्रकरणाचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे……

१. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी ‘१० टक्के योजना’ अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांसाठी बनावट कागदपत्रे सादर केली, असा आरोप करण्यात आला. १९९५ मध्ये हा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन अपक्ष आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
२. २९ वर्षांनंतर नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला २० फेब्रुवारी २०२५ रोजी दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ₹५०,००० दंड ठोठावण्यात आला.
३. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे बंधूंच्या शिक्षेला २४ फेब्रुवारी २०२५ रोजी तात्पुरती स्थगिती दिली आणि प्रत्येकी ₹१ लाखाच्या जामीनावर त्यांची सुटका केली.
४. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सत्र न्यायालयात कोकाटे यांनी आपल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने हा निर्णय १ मार्चपर्यंत राखून ठेवला.
५. १ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने स्पष्ट केले की, मुळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच निर्णय होईल.त्या सोबतच या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ देण्यात आला..
६. पुढील सुनावणीची तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली होती . तर आज ५ मार्च २०२५ रोजी कोकाटे यांच्या शिक्षेवर स्थगिती मिळते का, याचा निर्णय होणार होता. जर शिक्षेवर स्थगिती मिळाली नाही, तर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेमुळे त्यांचे आमदारकीचे पद गमावण्याची शक्यता आहे.असे जनतेला वाटत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. तर कालपासून विधानभवन परिसर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दणाणून सोडला होता. त्यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर आज विरोधक न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा आक्रमक दिसू शकतो. परंतु माणिकराव कोकाट यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे …
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






