best news portal development company in india

नासिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव खासदार राजाभाऊ वाजे यांची पाचवी भेट….

SHARE:


 पत्रकार:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
 बहुप्रतिक्षेत व  बहुचर्चित असलेला नासिक- पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा एकदा रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व पाठपुरावा  करत हायस्कूल रेल्वे याविषयी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची पाचवी भेट घेतली.नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर मार्गाने च हवा कारण चाकण, सिन्नर,सातपुर येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन हा प्रस्तावित रेल्वे मार्ग जुन्या मार्गाने च हवा असा आग्रह धरत आपल्या भुमिकेवर काम असल्याचे नाशिक चे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
    नाशिक:- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा २३४. ६०कि.मी लांबीचा प्रस्तावित सेमी हायस्पीड दुहेरी मार्ग आहे.जो महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकला चोवीस स्थानकाद्वारे जोडला जाणार आहे आणि त्याची किंमत १६,०३९कोटी रूपये आहे. नाशिक पुणे हायस्पीड  रेल्वे मार्ग हा फक्त नाशिक किंवा पुण्याच्या विकासासाठी नसून तो पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील विकासच्या उद्योगासाठी फायद्याचा ठरणार आहे.दक्षिण भारताची जलद गतीने जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
     तसेच या ग्रिनफिल्ड मार्गावरील प्रवासी गाड्या, दोनशे किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील, या रेल्वे मार्गाची अंतिम मुदत २०२७ आहे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातीमधुन जातांना पुणे ते नाशिक हे अंतर दोन तासात पूर्ण करेल , या मार्गांवरील मालगाड्या शंभर किमी प्रति तास वेगाने धावतील. व चाकण , खेड, नारायणगाव,मंचर,आणि सिन्नर,सातपुर औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा जुन्या मार्गाने च हवा असा आग्रह धरत खासदार राजाभाऊ वाजे यांनी उचलून धरली आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई