पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारितेतील मूल्ये आणि समाजाच्या भल्यासाठी पत्रकारांची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला…
नाशिक :- आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025, रोजी नाशिक येथील पंचवटीतील गोदावरी हॉटेल येथे ज्येष्ठ पत्रकार संतोष जाधव साहेब व त्यांचे सहकारी यांच्या अध्यक्षतेखाली जनकल्याण मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या स्थापनेसाठी आणि भविष्यातील दिशादर्शक धोरणांवर चर्चा करण्यासाठी विशेष विचार-विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या ऐतिहासिक बैठकीला नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सटाणा, दिंडोरी, निफाड, इगतपुरी आणि नाशिक येथून आलेल्या पत्रकारांनी या नव्या संघटनेबद्दल आपला आनंद आणि आशा व्यक्त केल्या.
या बैठकीदरम्यान संतोष जाधव साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाच्या ध्येय-धोरणांविषयी माहिती दिली. पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारितेतील मूल्ये आणि समाजाच्या भल्यासाठी पत्रकारांची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीच्या वेळी अनेक मान्यवर पत्रकारांनी आपले विचार मांडले. त्यामध्ये पत्रकार बैरागी, दाणी, अन्वर पठाण, महिला पत्रकार, बंटी आढाव, जाधव आणि प्रकाश बागुल यांनी आपल्या मनोगतातून नव्या पत्रकार संघटनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. पत्रकारांसाठी हा नवा मंच सक्षमपणे काम करेल, असे मत सर्व पत्रकारांनी व्यक्त केले.


यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष जाधव साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल आणि नवीन संघटनेच्या स्थापनेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.
बैठकीच्या शेवटी सर्व पत्रकारांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि पुढील बैठकीबाबत चर्चा करण्यात आली. नव्या संघटनेची कार्यप्रणाली, सदस्य नोंदणी आणि भविष्यातील उपक्रमांसाठी लवकरच नियोजन करण्यात येईल सांगण्यात आले आहे.
“जनकल्याण मराठी पत्रकार संघ” हा पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्यासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. हा संघ पत्रकारांसाठी न्याय आणि पारदर्शकतेचा आवाज बनेल, असा विश्वास सर्व पत्रकारांनी व्यक्त केला.
शब्दांकन (पत्रकार प्रकाश बागुल)
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





