नाशिक देवळा ता. उन्हाळ कांद्याचे तणनाशक बोगस, कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या कडून दखल.. !
इंडिअन पेस्टीसाइड्स लिमिटेड कंपनीच्या ‘क्लोगोल्ड’ या तणनाशकामुळे उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावरील पीक तणनाशक फवारणीमुळे संपूर्णपणे पीक नष्ट,प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन ….
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
नाशिक:- जिल्हातील देवळा तालुक्यातील मेशी आणि परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावरील पीक तणनाशक फवारणीमुळे संपूर्णपणे नष्ट झाले आहे. इंडियन पेस्टीसाइड्स लिमिटेड कंपनीच्या ‘क्लोगोल्ड’ या तणनाशकामुळे हे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी काल रात्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
–
सदर प्रकारामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले असून, या गंभीर नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मी दिले आहेत. यासोबतच नुकसान भरपाई तत्काळ देण्याच्या सक्त सूचना संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या.
तणनाशकाचे दोन नमुने खाजगी प्रयोगशाळेत आणि दोन केंद्र शासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले. तसेच, नुकसानग्रस्त जमिनीचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना तणनाशक औषधाचे सखोल परीक्षण करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आपला संकल्प कायम असून, योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि जबाबदार कंपनी यांच्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. या पाहणीदरम्यान चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर देखील उपस्थित होते.
प्रतिनिधी:-भाऊसाहेब हांडोरे,सिन्नर
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......







