best news portal development company in india

बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना “जागतिक मराठी भुषण” पुरस्कार प्रदान…..

SHARE:

माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना “जागतिक मराठी भुषण” पुरस्कार प्रदान…

 प्रतिनिधी नाशिक:- जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालायत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक मराठी संमेलनात भारत विकास गृपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते जागतिक मराठी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संमेलनाचे अद्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, जागतिक मराठी अकादमीचे अद्यक्ष रामदास फुटाणे, स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी, सांस्कृतीक कार्यमंत्री अशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, पत्रकार राजीव खांडेकर, विकास देशमुख अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते. 

या वेळी गायकवाड म्हणाले,
“देशभरातील १ लाख लोक बीव्हीजी नावाच्या संस्थेत काम करत आहेत. या पुढे १० लाख भारतीय युवकांना भारत सरकार व बीव्हीजीच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे. 

 

  भक्तीरसाचा अवलंब केला तर यश मिळतेच. बीव्हीजी भक्तीरसातुन स्वच्छतेचे काम करते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदीरासहीत अनेक मंदीरे स्वच्छ ठेवण्याचे काम बीव्हीजी करत आहे.”
   बीव्हीजी स्वच्छता सेवे बरोबर आरोग्य व कृषी क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. हृद्यरोग, यकृताचे अजार, कॅन्सर या सारख्या भयावह आजारांवरची विविध औषधे निर्माण करण्यात येत आहे. देशभरातील अनेक रुग्णांना या औषधांचा फायदा होत आहे. 
    शरदचंद्र पवार साहेब म्हणाले, हणमंतराव गायकवाड हे जिद्द व चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे परदेशात सुद्धा ते त्यांच्या कार्याचा ठसा उमटवतील. मराठी उद्योजकांचे सुवर्ण युग हनमंतराव गायकवाड यांनी सुरु केले आहे.
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई