best news portal development company in india

सिंहस्थामुळे त्र्यंबकेश्वरचे नाव जगाच्या नकाशावर गाजले पाहीजे – आमदार हिरामण खोसकर 

SHARE:

         कुंभमेळ्यासाठी स्थानिक व तालुक्यातील २१ जणांची कमिटी बनवणार,सिंहस्थामुळे त्र्यंबकेश्वरचे नाव जगाच्या नकाशावर गाजले पाहीजे – आमदार हिरामण खोसकर

  जेष्ठ नेते सुरेशतात्या गंगापुत्र यांनी अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या निवृत्तीनाथ यात्रेबाबद सुचना केल्या.

प्रतिनिधी:-रविंद्र धारणे,त्र्यंबकेश्वर 
   आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या करीता दर महिन्याला साधुसंत, सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ, यांची एकत्रित मिटींग घेतली जाईल. सुरुवातीचे दोन तास सर्वांच्या सुचना ऐकुन घेतल्या जातील व त्यानुसार कारवाई  होईल, अधिकारी, लोक प्रतिनिधी येतील जातील, गाव तुमचं आहे, तुमच्या सुचनेनुसार विकास कामे होतील. येथे येणारा भाविक आनंदीत होऊन गेला पाहीजे. कुंभमेळ्यासाठी स्थानिक व तालुक्यातील २१ जणांची कमिटी बनवा. कमिटीत कोणाला घ्यायचे? हे तुम्हीच ठरवा, कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकचे नाव जागतिक स्तरावर गाजले पाहीजे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. असे प्रतिपादन ईगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी नगर पालीका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

  आगामी सिंहस्थ कुंभमेळा नियोजना  साठी येथील विविध धार्मिक संस्थान, पुरोहित संघ, विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरीक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन सोमवार दि. १३ जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. बैठकीचे आयोजन आमदार हिरामण खोसकर यांनी केले होते.

      बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार खोसकर हे होते. तर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डाॅ. श्रीया देवचके, संपतराव सकाळे, सुरेशतात्या गंगापुत्र, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, स्वप्निल शेलार, शांताराम बागुल,  लक्ष्मीकांत थेटे,  गिरीश जोशी, प्रशांत गायधनी आदी  मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना त्र्ंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी बैठकीची संकल्पना स्पष्ट केली. नगर पालीकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी विकास आराखडा वाचुन दाखवला. यामध्ये त्यांनी मेनरोड परिसरातील गंगास्लॅब काढुन तेथे वाहती गंगा व सुशोभिकरण याबाबद सुचना मागवल्या. नगरीची भौगोलीक परिस्थिती बघता या कामाला सर्वांनी विरोध दर्शवला. तर मेनरोड दगडी बनवायच्या कामाचे सर्वांनी स्वागत केले. रस्ते बनवतांना खोदकाम करुन रस्त्याची उंची कमी करण्याची सुचना अनेकांनी केली.

    यानंतर व्यासपिठावरील मान्यवरांसह गोविंदराव मुळे, सुयोग वाडेकर, एन.डी. गंगापुत्र, संतोष भुजंग, बहिरु मुळाणे, डाॅ. रमेश पवार, हरिभाऊ अंबापुरे, अनंता उपाध्ये, नाना दोंदे,  विजु पुराणिक अशा ३२ जणांनी विविध सुचना मांडल्या. 
   कुंभमेळा संदर्भात सर्वांनीच सुचना दिल्यामुळे जेष्ठ नेते सुरेशतात्या गंगापुत्र यांनी अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या निवृत्तीनाथ यात्रेबाबद सुचना केल्या. यात्रेपुर्वी त्र्यंबक नाशिक रस्ता दुरुस्त व्हावा, भुयारी गटार अंतर्गत फोडलेले रस्ते दुरुस्त करावेत, आमदारांनी भुयारी गटार कामाची पहाणी करावी, सर्व पथदीप  सुरु करावे अशा सुचना केल्या. याचबरोबर निर्मल वारी अंतर्गत फिरत्या शौचालयाच्या कामावर त्यांनी  सडकुन टिका केली. दरवर्षी या  अंतर्गत तिन दिवसांसाठी शासन नव्वद लक्ष रुपये फिरत्या शौचालयावर खर्च करते. खरोखरच याचा फायदा होतो का?  गेल्या चार वर्षांचा विचार करता साडेतीन कोटी पेक्षा अधिक खर्च यावर होतो. एवढ्या पैशात ठिकठिकाणी कायम स्वरुपी शौचालय उभे राहु शकते. त्यामुळे आमदारांनी स्वत: यामध्ये लक्ष घालुन हि उधळपट्टी थांबवावी असे सांगितले. तसेच निवृत्तीनाथ मंदीराच्या दगडी सभामंडपाचे सदोष होत असलेले काम व भाविकांनी दिलेल्या देणगीची विश्वस्तांनी केलेल्या उधळपट्टीवर सडकुन टिका केली.
       यावेळी माजी लोकप्रतिनिधी, शहरातील, तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.                             प्रतिनिधी रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
Aone News Maharashtra
Author: Aone News Maharashtra

जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......

best news portal development company in india
सबसे ज्यादा पड़ गई