अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.

प्रतिनिधी:- रवींद्र धारणे,त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर:-दरवर्षीप्रमाणे पौष शुध्द षष्ठी अर्थात बांगर षष्ठीला खंडेराव महाराज यात्रा संपन्न होत असते. सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
निल पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. यात्रेनिमित्त सकाळी कडलग परीवाराच्या वतीने विष्णु तथा ललीत कडलग व सौ. संगिता कडलग यांनी सपत्निक श्री खंडेराव महाराजांची षोडशोपचारे पुजाअर्चना करुन महानैवेद्य व आरती केली तसेच ध्वजपुजन करुन कळसावर ध्वजारोहन करण्यात आले. पौरोहित्य मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती रतीश व सतीश दशपुत्रे यांनी केले. लोणारी परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे माजी नगरसेवक दिपक लोणारी यांचे हस्ते श्री सत्यनारायणाची पुजा करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता अडसरे परिवाराच्या वतीने ५१ फुट उंचीची मानाची काठी ढोलताशांच्या गजरात मिरवण्यात आली. पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत श्री खंडेरावाची मुर्ती ठेवण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर मंदीरात भगवान भोलेनाथ आणि श्रीखंडेरावाची भेट घडवण्यात आली. मिरवणुकीत नाचणारे अश्वासहित असंख्य बाल वारकरी सामील झाले होते. चौकाचौकात मानाची काठी नाचवण्यात आली. यावेळी काशिनाथशेठ अडसरे, सुनिल अडसरे, किरण अडसरे, वसंत अडसरे, प्रविण अडसरे, योगेश अडसरे, बाळासाहेब अडसरे, गोटु अडसरे, भुषण अडसरे, वैभव अडसरे आदि अडसरे परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली. मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी व गोडीशेव यांची दुकाने लागली होती. सायंकाळी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष विष्णु कडलग, प्रतिक कडलग, सागर कडलग, राजेंद्र कडलग, हेमंत तथा इंदा कडलग, शिवाजी कडलग, राजु कडलग, संजय कडलग, दत्तात्रय कडलग, दिलीप कडलग, संदीप कडलग, अभिषेक कडलग, आदिंसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 
प्रतिनिधी रविंद्र धारणे, त्र्यंबकेश्वर
aonenewsmaharashtra@gmail.com
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





