प्रतिनिधी नाशिक,
मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य वतीने चांदवड होळकर नगरी दुमदुमली तिसरे राज्य अधिवेशन तसेच राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद होळकर वाडा रंग महाल येथे आणि धनगरी नृत्य सादर करण्यात आली…

नाशिक:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण भारतभर मातोश्रींचे हे त्रिशताब्दी वर्ष साजरी करत आहेत,त्यानिमित्त मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य वतीने चांदवड येथे रंगमहाल होळकर वाडा या ठिकाणी मातोश्रींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे विचारवंत या चांदवड नगरीमध्ये आले.या होळकर वाड्यात मोरे क्रांती महासंघ यांनी आपले तिसरे राज्य अधिवेशन तथा राज्यस्तरीय धनगर जागृती परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेचे उद्घाटक माननीय सुभाष पवार साहेब होळकर ट्रस्ट छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) चांदवड हे अध्यक्ष होते तसेच होळकर वाड्याची माहिती देण्यासाठी इतिहासकार संजय बिरारी यांनी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या सदस्यांना होळकर वाड्याची व चांदवडची माहिती सांगितली व तसेच चांदवडी रुपया व नाणी प्रदर्शन होळकर वाड्यात ठेवण्यातआले होते .रेणुका माता मंदिराची दर्शन घेऊन या सोहळ्यास सुरुवात झाली व त्या ठिकाणी धनगरी नृत्याची गज नृत्य मध्ये सुरुवात केली.

धनगर नृत्यावर सर्वच होळकर प्रेमी व चांदवड मधील जनता ठेका धरला होळकर वेशीतून संपूर्ण चांदवड मध्ये या नृत्याने गर्जना केली .तसेच रेणुका लॉन्स या ठिकाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार घालून तसेच धनगरी नृत्य व सुंभारण हे गीत गाऊन या परिषदेची सुरुवात केली.परिषदेचे उद्घाटक शिवाजी शेंडगे हे होते. तसेच अध्यक्ष माननीय बलभीम माथेलेहे होते. प्रमुख पाहुणे म्हणून यादव सर होळकर घराण्याची वंशज मुकुंदराजे होळकर, शिवाजी शेंडगे,समज नेते मच्छिंद्र भाऊ बिडकर, विठ्ठल भाऊ मारणार, हनुमंत दुधाळ, समाधान बागल सामाजिक कार्यकर्ते प्रास्ताविक राजू हाके सर यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश कुठे सर यांनी केले.
तसेच विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले माननीय आर एस यादव सर यांना मोरे क्रांती महासंघ यांच्याकडून सत्यशोधक विचाराचे अन्याय माननीय मारुती रावजी पिसाळ मामा यांच्या स्मरणार्थ सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला.विठ्ठल भाऊ मारणार यांना ठेलारी समाजाचे नेते पुरस्काराने गौरवण्यात आले.चांदवड येथे होळकर नगरीचा इतिहास जागृत करण्यासाठी मोरे क्रांती महासंघाचा नासिक जिल्हा व चांदवड च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक सदस्य समाधान बागल.मुकुंदराजे होळकर, मच्छिंद्र भाऊ बिडकर,अमोल गजभार सर ,साहेबराव बागल, बापू शिंदे, पिंटू गाडे,यांच्या वतीने सन्मानचिन्ह तसेच अहिल्यादेवींची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर अनेक विषयांवर ती विचारवंतांचे व्याख्यान झाली. विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचे मूळ आहे या विषयावरती माननीय तुकाराम जानकर साहेब यांनी आपली भूमिका मांडली. समाज परिवर्तनाच्या कार्यात बुद्धिजीवी वर्गाची भूमिका काय असावी हे डॉक्टर एडवोकेट उत्तम भाई कोळेकर यांनी परिषदेत आपले मनोगत व्यक्त केले. संचित धनवे यांनी महानायक खंडोबा यांचे लेखक करून खंडोबा आणि सिंधू संस्कृतीचा वारसा तसेच आजच्या काळात प्रसंगी बनवून बहुजन समाजाचे उत्खनन करण्याची कार्यपद्धती काय असायला हवी या विषयावरती परिषदेमध्ये सांगितले .
दुसऱ्या सत्रामध्ये आरक्षणच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेली भांडणे जातीय द्वेष न वाढवता समोपचाराच्या पद्धतीने सोडवण्याची प्रक्रिया काय असायला हवी यावर डॉक्टर दत्तात्रय भरणे व सत्यवान दुधाळ यांनी आपले विचार मांडले समाज परिवर्तनाच्या कार्यात महिलांनी कोणती भूमिका घ्यावी या विषयावरती माननीय इंजिनियर मनीषा दुकाने, व माननीय अडवोकेट ऋचा हाके यांनी आपली भूमिका मांडली.
विचार व्यक्तीला समाजाला वाहन बनवतो विचारांचा प्रचार प्रसार करणारी यंत्रणा म्हणजे संघटनेची वाढ विस्तार करण्यासाठी आपली भूमिका काय असायला पाहिजे यावरती संदीप दासनोर व अजय पडघन यांनी आपली भूमिका मांडली,
शेवटी आभार प्रदर्शन सौ शैला नवघरे यांनी केले.
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......






