प्रतिनिधी नाशिक
जळगाव, ता.चाळीसगाव मौजे बहाळ रथाचे येथील सरपंच व साथीदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे यांनी सापळा रचून, लाज घेताना रंगेहाथ पकडले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव, ता.चाळीसगाव मौजे बहाळ रथाच येथील आरोपी 1) राजेंद्र महादू मोरे, वय – 57 पद -सरपंच ग्रामपंचायत बहाळ रथाचे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव.2) शांताराम तुकाराम बोरसे, वय 50 वर्ष,रा. बहाळ रथाचे पद- (ग्रामपंचायत शिपाई )ता.चाळीसगाव, जि.जळगाव 3) सुरेश सोनू ठेंगे, वय 40 वर्ष, व्यवसाय – शेती, रा.बहाळ ता.चाळीसगाव, जळगाव (खाजगी इसम) यांनी सदर यातील तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव, जि जळगाव येथे तक्रारदार यांची गट क्रमांक 57/2 क्षेत्र 1हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध मा. न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
त्यानंतर आरोपी राजेंद्र महादू मोरे सरपंच यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले,पण त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने आलोसे क्र. 1 यांनी 10,00,000/- रू. लाचेची मागणी केली त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे धाव घेतली व तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची दि.29/11/2024 रोजी पंचांग समक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र. 01 व 02 यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता, त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने आलोसे क्र. 01 व 02 यांनी 10,00,000/- रू लाचेची मागणी केली, परंतु तक्रारदार यांनी नकार दिला व तडजोडी अंती 5,00,000/- रुपये लाचेची रक्कम मान्य केली.
त्यानंतर आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.विभागीय आयुक्त नासिक.
परिवेक्षण अधिकारी-श्री. सचिन साळुंखे,पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. तसेच सापळा अधिकारी-पंकज शिंदे,पोलीस निरीक्षक लाचलुचपात प्रतिबंधक विभाग धुळे. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाची नेमणूक करून,सापळा रचण्यात आला.यात सापळा पथक:-पो.हवा.राजन कदम,पो. हवा. पावरा, सुधीर मोरे, पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील यांची नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. कडून निवड करण्यात आली.
त्याप्रमाणे आज दि.26.12.2024 रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता आलोसे क्र. 01 व 02 यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 2,00,000/-रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी क्र.3) यांना रंगेहात पकडण्यात आले व गुन्हा दाखल करण्यात आला.
मार्गदर्शक:-मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी इसम याने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे.
दुरध्वनी क्रमांक:-02562234020
टोल फ्री क्रमांक 1064 येथे संपर्क साधावा..
Author: Aone News Maharashtra
जनतेच्या न्याय हक्का साठी Aone News Maharashtra aonenewsmaharashtra.in आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह बातम्या प्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल अपडेट्स पुरवत आहेत. तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.आमच्या कार्यसंघामध्ये अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त व्यावसायिकांचा समावेश आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य आहे आणि ते तुम्हाला सर्वोत्तम बातम्या सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही सचोटीने, न्यायाने आणि स्वातंत्र्याने बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून तुम्हाला आमच्याद्वारे खरी आणि निर्णायक माहिती मिळू शकेल. बातम्या आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, समृद्धी आणि प्रगतीकडे मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही तुम्हाला नेहमीच पाठिंबा देण्यासाठी येथे आहोत आणि आम्ही तुमच्या सूचना आणि अभिप्रायाचे स्वागत करतो.आम्ही तुम्हाला बातम्यांच्या जगात अद्ययावत राहण्यात मदत करूतो, आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.......





